शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
4
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
5
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
6
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
7
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
8
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
9
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
10
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
11
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
12
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
13
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
14
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
15
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
16
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
17
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
18
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
19
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
20
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम

बडनेरात जय हनुमानच्या गजरात एकट्या भक्तांने ओढल्या भरगच्च नऊ बंड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 12:08 PM

६१ वर्षांपासूनची परंपरा जोपासली

बडनेरा (अमरावती) : एकट्या हनुमान भक्ताने जवळपास पाचशे मीटर अंतरापर्यंत भक्तांनी भरगच्च भरलेल्या नऊ बंड्या ओढल्या. हनुमान जन्माच्या दिवशी जुन्यावस्तीतील बारीपुरा स्थित हनुमान मंदिराच्या वतीने ६१ वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. हा उत्सव पाहण्यासाठी हनुमान भक्तांची याठिकाणी एकच गर्दी जमली होती. यंदा गुरुवारी सायंकाळी नव्या भक्ताने गाड्या ओढल्या, हे विशेष.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बारीपुऱ्यातील हनुमान मंदिराच्या वतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता एकटा हनुमान भक्त पाचशे मीटर अंतरापर्यंत भक्ताने भरगच्च भरलेल्या नऊ बंड्या ओढल्या. ही परंपरा बारीपुरा परिसरात राहणाऱ्या रूपराव जाट नामक हनुमान भक्ताने सुरू केली. तेव्हापासून ही परंपरा येथे निरंतर सुरू आहे.

मोठ्या संख्येत हनुमान भक्त बंड्यांवर बसलेले हाेते. सर्वांच्या हातात भगवे झेंडे होते. 'जय हनुमान' 'जय श्रीराम'च्या गजरात हनुमान भक्त गाड्या ओढत अवघ्या काही वेळातच हनुमान मंदिरापर्यंत पोहोचला. यावेळी परिसर हनुमानाच्या गजराने दुमदुमून गेला होता. बडनेरा शहरासह परिसरातील खेड्यांवरील लोक हा धार्मिक उत्सव पाहण्यासाठी येथे मोठ्या संख्येत आले होते. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. त्याचप्रमाणे संस्थानच्या वतीनेदेखील याची खबरदारी घेण्यात आली.

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी गुरुवारी पहाटे हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. त्यानंतर सकाळी सात वाजता शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. साडेनऊ वाजता गोपाल काल्याचे कीर्तन झाले. दुपारी भव्य महाप्रसाद होता. एक हनुमान भक्त सलग पाच वर्षांपर्यंत गाड्या ओढत असून, हीच परंपरा पूर्वीपासून येथे सुरू आहे.

टॅग्स :SocialसामाजिकHanuman Jayantiहनुमान जयंतीAmravatiअमरावती