शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

एका रात्रीतून ६८६ पोलिस उतरले रस्त्यावर, ६९ आरोपींच्या मुसक्या

By प्रदीप भाकरे | Published: July 17, 2023 5:46 PM

ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट : फरार, वॉटेड आरोपींना केली अटक

अमरावती : आगामी सण उत्सवादरम्यान गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था राखण्यासह मालमतेच्या गुन्हयांवर अंकुश लावण्याकरिता ग्रामीण पोलिसांनी १६ जुलै रोजी रात्री १२ ते १७ जुलैच्या पहाटे पाच वाजेपर्यंत ऑपरेशन ऑलआऊट राबविण्यात आले. मोहीमेदरम्यान महत्वाचे रस्त्यांसह राज्याच्या सिमेवर सशस्त्र नाकाबंदी करण्यात आली. मोहिमेदरम्यान पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासह ६८६ अधिकारी कर्मचारी रस्त्यावर होते.

सराईत गुन्हेगारांच्या तपासणीसह त्यांची आश्रयस्थाने, फरार आरोपी, पकड वॉरंटमधील आरोपी अवैध व्यवसायिकांची तपासणी करण्यात आली आहे. फरार घोषित असलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली. यातील दोन आरोपी हे दहा व एक आरोपी पाच वर्षांपासून फरार होता. मोहिमे दरम्यान गस्तीवर असतांना अचलपूर, धारणी, परतवाडा, चांदूर रेल्वे व स्थानिक गुन्हे शाखेने पाच आरोपींविरूध्द शस्त्र अधिनियमान्वये कार्यवाही केली. तर, परतवाडा, वरूड, सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुन्हा करण्याच्या दृष्टीने संशयितरित्या फिरणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

६९ आरोपी अटक

मोहिमेदरम्यान पकड़ वारंटमधील एकूण ६९ आरोपींना अटक करण्यात आली. ३९ जमानती वारंट व ८४ समन्स बजावणी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान १०९ वाहनांवर कार्यवाही करण्यात आली. अवैध दारूविरुद्ध २२ केसेस करून ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अचलपूर व अंजनगांव येथे २४ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. शिरजगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश अनुषंगाने दोन कारवाया करण्यात आल्या. तेथून ५२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हेगारांवर वचक

मोहिमेदरम्यान पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, चार पोलीस उपअधिक्षक, ३१ठाणेदारांसह एकुण ८३ पोलीस अधिकारी व ६०३ पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला होता.अचानक रावबिलेल्या या मोहिमेमुळे समाजकंटक व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर चांगलाच वचक बसला असून अशा प्रकारच्या मोहीम सतत राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकAmravatiअमरावती