शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

शिक्षक बँकेत सत्ताधाऱ्यांचा विरोधकावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

By जितेंद्र दखने | Published: April 03, 2023 6:59 PM

शिक्षकांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षण सहकारी बँकेत सत्ताधारी विरोधी पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

अमरावती : शिक्षकांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षण सहकारी बँकेत सत्ताधारी विरोधी पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पाच संचालकांवर विश्वास ठरावाचा प्रस्ताव उपनिबंधकांकडे सादर करण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधी संचालकांमध्ये चांगलीच घुसखुश वाढवण्याची शक्यता आहे.

शिक्षक बँकेत शिक्षक समितीने एक हातीसत्ता स्थापन केली असून या पॅनलचे १६ संचालक निवडून आले आहेत. तर विरोधात पाच संचालक निवडून आले आहेत. अध्यक्षपदी गोकुळदास राऊत यांची वर्णी लागल्यानंतर सत्ताधारी व विरोधी संचालकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. अनेक मुद्द्यावरून विरोधी संचालकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यात येत आहे. मात्र बँकेच्या कामकाजात विनाकारण विरोधी संचालक आडकाटी आणत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला असून विरोधी गटातील संचालक प्रकाश झोड, संजय नागे, मंगेश खेरडे, मनोज चोरपगार आणि गौरव काळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी विशेष सभेची परवानगी देण्याबाबतची मागणी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे शिक्षक बॅकेतील सत्ताधारी संचालकांनी केली होती. मात्र हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. त्यामुळे तूर्तास विरोधकांवरील अविश्वासाचे सावट निवळले असले तरी येत्या काळात पुन्हा हा संघर्ष पेटण्याची दाट शक्यता आहे. विरोधी संचालक काही कारण नसताना गत सहा महिन्यापासून तक्रारी करून बँकेच्या कामकाजाचा अडचणी निर्माण करीत आहे. सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जात असताना विनाकारणच काही मंडळी सहकार विभागाकडे तक्रार करीत आहेत. दैनंदिन कामकाज सोडून बँकेला त्यांच्या विनाकारणच्या तक्रारी निस्तराव्या लागत आहेत. त्यामुळे बँकेचे नुकसान होत आहे. घटनेतील तरतुदी प्रमाणे आम्ही अविश्वासाची नोटीस दिली होती. - गोकुळदास राऊत, अध्यक्ष जि प शिक्षक बँक विरोधी संचालक सत्ताधारी गटाच्या चुकीच्या निर्णय विरोधात ठामपणे उभे राहिले आहेत. विविध नीती वापरून विरोधी संचालकांचे तोंड बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. विरोधी संचालकावर मानसिक दबाव या माध्यमातून निर्माण केला जात आहे. मात्र कुणाचाही दबाव न जुमानता सभासदांच्या हितासाठी लढत राहू. - प्रभाकर झोड संचालक विरोधी गट 

टॅग्स :Amravatiअमरावती