लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांच्या बडनेरा शहरातील मुख्य प्रचार कार्यालयाचा शुभारंभ भिक्षेकऱ्यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.यावेळी रवि राणा यांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडला. राजकमल चौक ते यवतमाळ टी-पॉइंटपर्यत ५५ कोटी निधीतून सिमेंट रस्ते निर्मिती, चौपदरीकरण, बडनेरा पोलीस ठाणे ते शासकीय विश्रामगृह, अडीच कोटींतून सिमेंट रस्ता, सावता मैदान येथे आठ कोटींतून सांस्कृतिक भवन, एक कोटीतून शादीखाना तसेच आमदारकीच्या वेतनातून छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळादेखील उभारला आहे. जुनीवस्ती स्थित कमलीवाले बाबा दर्ग्याचे एक कोटीतून सौंदर्र्यींकरण, जुनीवस्ती येथे पावणेदोन कोटीतून पाण्याची टाकी उभारण्यात आली. या विकासकामांची यादी रवि राणांनी सादर केली.उद्घाटनाप्रसंगी सर्वधर्मीयांची उपस्थितीने लक्ष वेधले. यावेळी डॉ. बळीराम ग्रेसपुंजे, नीळकंठ कात्रे, संजय बोबडे, माजी नगरसेवक मजिद बापू कुरेशी, जयंत वानखडे, विनय घिमे, सादीक टेलर, मंगेश मनोहरे, माहुलकर, अयूब खान, गारोडे काका, प्रकाश पहूरकर, अजय जयस्वाल, विलास वाडेकर, सिद्धार्थ बनसोड, जितू मोटवानी, कोटवानी काका, नील निखार, अनिल पारसकर, उमेश हिरवाळे, उमेश मेश्राम, हरभजनसिंग, कांतीलाल भट, पप्पू भालेराव, प्रमोद गवई, अष्टशील बोरकर, सादीक गदर, सलिम खान, अमोल मिलखे, विजय मलिक, तौफिक कुरेशी, पंकज शर्मा, नितीन सोळंके, सतीश भालेराव, मंगेश सोळंके, सोनू रूंगठा, मनोज भगत, वसीम खान, रावसाहेब टाले, खुशाल गोंडाणे, विनोद जायलवाल, रौफ पटेल, आफताब खान, मंगेश चव्हाण, संजय पंचारे, रवि वानखडे, विजय तांबे, कृष्णा मेश्राम, अशोक पारसकर, संजय मुंडले, मलकुसिंग, अजमत खान, अशोक सिंघई, नूतन वासनिक उपस्थित होते.
रवि राणांच्या प्रचार कार्यालयाचा भिक्षेकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 6:00 AM
यावेळी रवि राणा यांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडला. राजकमल चौक ते यवतमाळ टी-पॉइंटपर्यत ५५ कोटी निधीतून सिमेंट रस्ते निर्मिती, चौपदरीकरण, बडनेरा पोलीस ठाणे ते शासकीय विश्रामगृह, अडीच कोटींतून सिमेंट रस्ता, सावता मैदान येथे आठ कोटींतून सांस्कृतिक भवन, एक कोटीतून शादीखाना तसेच आमदारकीच्या वेतनातून छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळादेखील उभारला आहे.
ठळक मुद्देबडनेरा मतदारसंघ : रस्त्यांचे प्रथमच सिमेंट काँक्रिटीकरण