शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

विदर्भाच्या कॅलिफोनिर्यात संत्रावर शंखी रोगाचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:11 PM

Amravati : संत्रा उत्पादक चिंताग्रस्त; शासनाद्वारे मदतीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क शेंदूरजनाघाट : संत्र्याच्या उत्पादनावर अर्थकारण असलेल्या विदर्भातील कॅलिफोर्नियाचा शेतकरी झाडांवर झालेल्या शंखी रोगाच्या प्रादुर्भावाने हवालदिल झाला आहे. अतिपावसामुळे आधीच आंबिया बहराची संत्री गळून पडत असताना हे मोठे संकट सर्व नेस्तनाबूत करेल, अशी भीती व्यक्त होत आहे. 

नगदी पीक समजल्या जाणारे संत्रा पीक हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरिपातील पिके अतिपावसामुळे बाधित होत असतानाच यंदा संत्र्याच्या दोन्ही बहरांना ग्रहणच लागले. फळगळ होत असल्याने संत्रा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बाधित झाडांचा सर्व्हे करण्याची मागणी शेंदूरजनाघाट परिसरातील शेतकरी करीत आहेत. बदलत्या वातावरणात व रोगाने संत्रा झाडे पिवळी पडून वाळू लागल्याने विदर्भाचा कॅलिफोर्निया नष्ट होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे संत्रा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आंबिया बहराच्या गळतीचे प्रमाण ३० ते ४० टक्के एवढे असल्याचे संत्रा उत्पादक बोलत आहेत. त्यामुळे नुकसानाची भरपाई देण्याची माणगी शेतकऱ्यांनी केली आहे.

गळतीने वाढले नुकसान यावर्षी सुरुवातीपासून संत्रा फळाला गळती सुरू आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्यातही दररोज पाऊस असल्याने आंबिया बहराची संत्री मोठ्या प्रमाणात गळत आहेत, तर मृग बहर फुटलाच नाही. यावर्षी आंबिया बहर जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात फुलला होता. मात्र, मार्च, एप्रिल महिन्यातच मोठ्या प्रमाणात गळती लागली. पावसाळा सुरू होताच ही गळती वाढली आहे. संत्रा उत्पादन घेणाऱ्या शेंदूरजनाघाट, तिवसाघाट, बारगाव, जामगाव, धनोडी, लोणी, जरूड, टेंभुरखेडा, मालखेड, धनोडी पंढरी, पुसला, सुरळी, एकदरा, झटामझिरी, वाई, राजुरा बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात संत्रा झाडांवर शंखी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेंत पडला आहे.

"यावर्षी झालेल्या पावसामुळे आंबिया बहराची संत्री गळली. आता झाडे पिवळी पडून वाळत आहेत. शंखी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून शासनाने त्वरित मदत द्यावी."- चेतन सावरकर, उत्पादक

"शेंदूरजनाघाट परिसरात आंबिया बहर घेतला जातो. पावसाळ्यात शंखी आल्या व संत्रा झाडे पिवळे पडत आहेत. शासनाने शंभर टक्के अनुदानावर फवारणी औषध उपलब्ध करून द्यावी." - सतीश काळे, संत्रा उत्पादके

"फायटोप्थोरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संत्रा झाडे पिवळे पडून वाळत आहेत. त्यामुळे उत्पादकांचे नुकसान होत आहे. शासनाने संत्रा उत्पादकांना त्वरित मदत जाहीर करावी."- प्रफुल्ल कुबडे, संत्रा उत्पादक

 

टॅग्स :Amravatiअमरावती