शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

अभ्यासक्रमात जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:34 PM

फुले-शाहू-आंबेडकरांचे पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची देशात ओळख आहे. तरीही अत्र-तत्र-सर्वत्र अंधश्रद्धादि जादूटोण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. अंधश्रद्धेतून छोट्या बाळांपासून तर वृद्धांपर्यंत आणि स्त्रियांवर अत्याचार होत आहेत.

ठळक मुद्देपुरोगामी संघटनेची मागणी । संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश करा, अशी मागणी उपेक्षित समाज महासंघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पुरोगामी संघटनेच्यातीने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे शनिवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.फुले-शाहू-आंबेडकरांचे पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची देशात ओळख आहे. तरीही अत्र-तत्र-सर्वत्र अंधश्रद्धादि जादूटोण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. अंधश्रद्धेतून छोट्या बाळांपासून तर वृद्धांपर्यंत आणि स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. विद्यापीठात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून जादूटोणाविरोधी कायद्याच्या अभ्यासाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानाचा कुटुंब आणि समाजामध्ये विवेकनिष्ठ, बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैज्ञानिक, पुरोगामी दृष्टिकोन रुजविण्यासाठी तसेच समाजातील अंधश्रद्धा दूर होण्यासाठी मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण बनसोड, कार्याध्यक्ष श्रीकृष्णदास माहोरे, मिलिंद वाघळे, पुरुषोत्तम नागपुरे, मधुकर कोहळे, रजिया सुलतान, श्रीकृष्ण धोटे यांनी ही मागणी कुलगुरूंकडे केली. गोंडवाना विद्यापीठाच्या विधिसभा बैठकीतील निर्णयानुसार बी.ए. अंतिमच्या समाजशास्त्र विषयात जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश करण्यात आला आहे, हे विशेष!संत गाडगेबाबांनी समाजप्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचले. समाजाला पुरोगामी व वैज्ञानिक दृष्टी दिली. त्यांचे क्रांतिकार्याला आदरांजली म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश करून ऐतिहासिक व आजच्या संदर्भात फारच महत्त्वाचा निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कुलगुरू चांदेकर यांनी यावेळी दिले.

टॅग्स :collegeमहाविद्यालय