पुसला हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून, अदिवासी खेडी लागून आहेत. पुसला व परिसरात रोज कोरोना रुग्ण आढळत आहे. त्यांना थेट अमरावतीला हलविण्यात येत असल्याने व मृत्यूदर अधिक असल्याने नागरिकांना सर्दी वा खोकला, ताप आल्यास कोरोनाच्या भीतीने ते घरीच उपचार करतात. काही रुग्ण गावात उपचार घेत आहेत. कोरोना चाचणी केंद्र वरूड येथे असल्यामुळे अनेक जण तपासणीकडे पाठ फिरवितात. पुसला या गावाला सावंगी, उराड, जामठी, लिंगा, गणेशपूर, पिंपलागढ, महेंद्री, एकलविहीर आदी दुर्गम भागातील खेडी लागून आहेत. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता वाहनांची सुविधा नाही. त्यामुळे पुसला गावात कोरोना तपासणी केंद्र झाल्यास नागरिकांकरिता सोयीचे होईल, या उद्देशाने येथे कोरोना तपासणी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुसला परिसरात कोरोनाच्या रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:14 AM