शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

शहरात धूलीकणांच्या प्रदूषणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:47 PM

शहरात विकासकामांतून निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणारा धूर यामुळे बहुतांश भागात हवेचे प्रदूषण वाढले आहे. विशेष म्हणजे औद्योगिक परिसरात याचे प्रमाण अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक असल्याचा प्रदूषण नियामक मंडळाचा अहवाल आहे. हे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी घातक आहे.

ठळक मुद्देअनुज्ञेय पातळीवर प्रमाण : वाहनांची वाढती संख्या, पायाभूत सुविधांची निर्मिती कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात विकासकामांतून निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणारा धूर यामुळे बहुतांश भागात हवेचे प्रदूषण वाढले आहे. विशेष म्हणजे औद्योगिक परिसरात याचे प्रमाण अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक असल्याचा प्रदूषण नियामक मंडळाचा अहवाल आहे. हे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी घातक आहे.मागील दोन वर्षांच्या तुलनेत अमरावती शहराच्या वाणिज्य भागातील प्रदूषण काहीअंशी कमी असले तरी सरासरी अनुज्ञेय पातळीच्या अधिकच आहे. गेल्या वर्षभरापासून शहरात रस्ते, नाल्या, उड्डाणपुलाचे काम सुरू आहेत. त्यामुळेदेखील धूलिकनांचे प्रदूषण वाढल्याची शक्यता आहे. त्याचसोबत शहरात वाहनांची संख्या वाढल्यानेही प्रदूषणात वाढ झाल्याचे वास्तव आहे. अमरावती शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत अ‍ॅबीयंट एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग (अअदट) नुसार रहिवासी क्षेत्रात ठड रड2 चे प्रमाण १७.९९ व १४.१८ ४ॅ/े3 हे प्रमाण प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे. मात्र, फरढट (सूक्ष्म धूलिकण) सरासरी प्रमाण ११८.७६ ४ॅ/े3 आढळून आले. औद्योगिक क्षेत्रात ठड रड2 चे प्रमाण १८.९६ व १७.७८ ४ॅ/े3 आढळून आले आहे. हे प्रमाण प्रदूषण पातळीच्या कमी आहे. मात्र, फरढट चे प्रमाण १०८.९१ म्हणजेच अनुज्ञेय पातळीच्या पेक्षा (१०० ४ॅ/े3) आढळले. व्यापारी क्षेत्रात ठड रड2 चे सरासरी प्रमाण १८.९६ व १७.७८ ४ॅ/े3 हे प्रमाण प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे. मात्र, फरढट चे प्रमाण ११८.७६ ४ॅ/े3 म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक असल्याचा अहवाल आहे.वाढते नागरीकरण, डीजे संस्कृतीचे वाढते फॅड यामुळे शहराच्या ध्वनी प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर शारीरिक व मानसिकदृट्या मोठा परिणाम होतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालया सभोवती १०० मीटरच्या परिसरात शांतता क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात ५८१ ठिकाणी शांतता क्षेत्र घोषित केल्याचे महापालिका उपायुक्त महेश देशमुख म्हणाले.मानवी शरीरास घातकहवा प्रदूषणाने माणसाच्या श्वसन संस्थेचे रोग जडतात. फुफ्फुसाचा कर्करोग,हृदयरोग जडण्यासाठी श्वसनातून शरीरात जाणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते. प्रदूषित वातावरणात राहणाऱ्यांना तुलनात्मकदृष्ट्या हृदयविकाराचे झटके येतात. या अशुद्ध हवेने तसेच धूम्रपानातील धुराने रोहिणी या शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना स्लेरोसिसची व्याधी जडते व त्या सुजतात. प्रदूषणाचे संकट हे अदृश्य असल्याने, सर्वसामान्यांना त्याचा नकळत परिणाम झाला तरी बरेचदा प्रत्यक्षात जाणवत नाही.उच्च रक्तदाबाच्या आजारात वाढ -तज्ज्ञशहरात हवेचे प्रदूषण वाढल्याने नागरिकांना उच्च रक्तदाबाचे विकार जडतात. शहरातील वाहतूक, औद्योगिक कारखाने, उर्जा प्रकल्पातून उत्सर्जित होणारे सूक्ष्म घनकण हे रक्तदाबवाढीस कारणीभूत ठरतात. अशा प्रकारचा रक्तदाब पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. रक्ताचा वाढणारा दाब अ‍ॅथरोस्लेरोसिस या व्याधीचा प्रारंभ करतो व त्यातून रक्तवाहिन्या कठीण होत जातात. पुढे, त्याचा हृदयावर विपरीत परिणाम होतो. म्हणून हृदयरुग्णांनी प्रदूषित हवेपासून दूर राहणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.शहरात वाहनांची वाढती संख्या, पायाभूत सुविधांची निर्मिती आदींमुळे धूलिकणांचे प्रदूषण वाढत आहे. हे नियंत्रित करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे.- संजय पाटील,विभागीय व्यवस्थापक,प्रदूषण नियंत्रण मंडळ