अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, तिवसा या चार तालुक्यांतील काही गावांमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या पाचपेक्षा अधिक असल्याने ‘हॉट स्पॉट’ ठरली आहेत.
वाढत्या रुग्णामुळे प्रशासनाने पुन्हा निर्बंध कठोर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लग्न, सभा, समारंभातील गर्दीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार, ज्या गावात रुग्णसंख्या वाढत आहेत, अशा गावांची यादी करून कंटेनमेंट झोन तयार करण्याच्या सूचनाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
बॉक्स
अचलपूर तालुक्यात सर्वाधिक बाधित -४२३
हॉस्टस्पॉट कांडली ३८, देवमाळी ३१, ब्राम्हणसभा ५, अभिनव कॉलनी ५, खेल तापमाळी ५
बॉक्स
जिल्ह्यात दंडात्मक कारवाई
संबंधित ग्रामपंचायती तसेच गावस्तरीय समिती, ग्राम दक्षता समित्यांकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत मास्क न वापरणे व गर्दी याकरिता कठोर कारवाईच्या सूचना अमोल येडगे यांनी अधिनस्थ यंत्रणेला दिल्या आहेत.
बॉक्स
तालुक्यांतील संक्रमित व हॉट स्पॉट गावे अशी -
तालुका एकूण संक्रमित कोरोना अॅक्टिव्ह हॉट स्पॉट (रुग्णसंख्या)
अमरावती ४५ २९ ००
भातकुली २८ २० भातकुली शहर (७)
मोर्शी ६६ ३७ रिद्धपूर (८), मोर्शी -दुर्गानगर (८), चिचखेड (५)
वरूड ९५ ८३ वाॅर्ड-२ (१४), जरूड (१७),
अंजनगाव सुर्जी ७० ५० काटीपुरा (६)
चांदूर रेल्वे ४९ ३८ चांदूर रेल्वे (२०)
चिखलदरा १० ०६
धारणी ५० २४ धारणी (२४)
दर्यापूर २७ १३
धामणगाव रेल्वे ३६ २८ जुना धामनगाव (१०),धामणगाव (१५), मंगरूळ दस्तगिर (६)
तिवसा ११४ ८६ मोझरी (१४), गुरुदेवनगर (३६), तिवसा (७)
नांदगाव खंडेश्वर ५९ ४० वार्ड ३ (५), शिवणी (५), रोहना (६), मंगरूळ चव्हाळा (५)
एकूण ११३५ ८००
बॉक्स
आरोग्य विभागाचा ‘वॉच’
ज्या गावात कोरोना संक्रमित रुग्ण आहेत, अशा गावात क्लस्टर (कोरोना रुग्णाचा समूह) आहे, अशा ठिकाणी आरोग्य विभागाकडून कंटेनमेंट झोन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शिबिर घेऊन या ठिकाणी आरोग्य विभागाकडून ‘वॉच’ ठेवला जात आहे.
कोट
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे प्रशासन पुन्हा निर्बंध कठोर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे, नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी