शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

बांधकाम विभागाकडे वाढला सदस्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:16 AM

अमरावती : कोरोना प्रादुर्भावाने यंदाही ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशा स्थितीत त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ...

अमरावती : कोरोना प्रादुर्भावाने यंदाही ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशा स्थितीत त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा फायदा मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, निधीअभावी या योजना रखडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांचीही आता प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी बांधकाम विभागाकडे लगबग वाढली आहे.

जिल्हा परिषद प्रत्येक सदस्याला बांधकाम सोबत जनसुविधा आदी योजनांतर्गत वर्षाकाठी जवळपास ५० ते ६० लाख रुपयांचा निधी ग्रामीण भागातील विकासकामांकरिता उपलब्ध होतो. याशिवाय वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये सदस्यांना सर्कलनिहाय लाभार्थी संख्येनुसार या योजनेचा लाभ दिला जातो. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाकडून अनेक योजनांसाठीचा निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या योजना बारगळल्या आहेत. सद्यस्थितीत केवळ बांधकाम विभागाकडे पुरेसा निधी शिल्लक आहे. राज्यशासन, खनिज, डीपीसी, पंधरावा वित्त आयोग व इतर खात्याच्या अतिरिक्त निधी रस्ते, शाळा इमारतीसाठी खर्च होताना दिसत आहे.

बॉक्स

बजेट वाढूनही शेतकरी उपेक्षित !

जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी प्रथमच समाधानकारक तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना या विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळेल, अशी सर्वांनाच आशा होती. या विभागाच्या माध्यमातून सेस फंडाच्या निधीतून शेतकऱ्यांना ताडपत्री, एचडीपी, पाईप, मोटार पंप, तारांचे कुंपण आदीसाठी अनुदान वितरीत केले जाते. मात्र, यंदाही योजनांची गती मंदावल्याचे दिसून येत आहे.