वाहनचालक त्रस्त : राजकमल चौकात अस्वच्छतेने गाठला कळसलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजकमल चौकातील सिग्नलवर वाहने थांबताच भिकारी वाहनचालकाजवळ जाऊन भीक मागतात. पैसे मिळाले नाही की वाहनासमोर येऊन चक्क अंगावर धावतात. त्यामुळे या भिकाऱ्यांच्या नादी न लागता वाहन चालक त्यांना पैसे देऊन मोकळे होतात. असे प्रकार दररोज राजकमल चौकात पाहायला मिळत असून भिकाऱ्यांचा हा वाढत्या उपद्रवामुळे राजकमल चौकात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. शहरात भिकाऱ्यांचा वाढता उपद्रव अमरावतीकरांसाठी डोकेदुखी बनली आहे. राजकमल चौकात भिकाऱ्यांची टोळी पुलाखाली बसली असते. त्यांची दीनचर्या त्याच ठिकाणी पार पडत असल्यामुळे त्यांच्या सर्व क्रिया रस्त्यावरच आहे. दिवसभर भिक मागून पुलाखालीच चुला पेटवून जेवण तयार करणे व त्याच ठिकाणी झोपणे असे प्रकार चालत असल्यामुळे पुलाखालील जागा गलिच्छ केली आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. त्यापेक्षा भयंकर म्हणजे, भिक मागतात हे भिकारी वाहनासमोर येतात. वाहन चालक सिग्नल सुटायच्या प्रतीक्षेत असतात. अशाप्रसंगी भिकारी वाहनासमोर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. पैसे न दिल्यास वाहन समोर जाण्यास मज्जावही करतात. महिला भिकारी तर आपल्या लेकरांना समोर करून भिक मागतात. ईवल्याशा जीवाला रखरखत्या उन्हात फिरवित या वाहनचालकाकडून त्या वाहनचालकांपर्यंत जातात. हा सर्व प्रकार वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या निदर्शनास येतात. अनेकदा पोलीस या भिकाऱ्यांना हाकलून लावण्याचे प्रयत्न करतात. मात्र, हे भिकारी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्यास पुढेमागे पाहत नाही. भिक मागताना कोणी रोखल्यास त्यांनाच गलिच्छ शिवीगाळ केली जाते. त्यामुळे या भिकाऱ्यांच्या तोंडी न लागता, त्यांना पैसे देऊन सुटका करून घेतली जाते. भिकाऱ्यांची लहान मुले वाहनाच्या अवतीभोवती फिरत भिक मागतात, अशावेळी वाहनाचे चाक या मुलांच्या पायाला स्पर्श करून जातात. अशाच प्रसंगातून एखादी अप्रिय घटना सुध्दा घडू शकते, याची पुसटशी कल्पनाही कोणी करीत नाही. शहरातील सिग्नलवर धोकादायक स्थितीत फिरणाऱ्या या भिकाऱ्यांवर नेमकी कारवाई करणार तरी कोण, याबाबत पोलीस यंत्रणा व अन्य प्रशासकीय विभागाने हातवर केले आहे.हीच स्थिती राहिल्यास राजकमल चौकाप्रमाणे अन्य चौकसुद्धा भीक मागण्याचा अड्डाच बनेल. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भिकाऱ्यांचा उपद्रव वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दररोज वादविवाद, गोंधळ, आरडाओरडराजकमल चौक भिकाऱ्यांचे रहिवासी स्थान असल्यामुळे त्यांचे आपसात वादविवाद होणे साहजीक आहे. या वादातून दररोज कल्लोळ, गोंधळ व त्यांचा आरडाओरड होत असल्याचे चित्र अमरावतीकरांसाठी काही नवखे राहिले नाही. भिकाऱ्यांचा होणारे वाढते वाद हे पोलीस ठाण्यापर्यंत सुध्दा पोहोचले आहेत. त्याचा हा वाद आम रस्त्यावर होत असल्यामुळे वाहतूक विस्कळीतसोबतच वाहनाचालकांसाठी लक्षवेधी ठरत आहे. अशावेळी वाहतूक नियंत्रणाचा बोजबारा वाजत आहे. पार्किंगमधील वाहने असुरक्षितराजकमल चौकातील उड्डाणपुलाखाली वाहने पार्क केली जात असून या वाहनांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भिकाऱ्यांची उड्डाणपुलाखालील जागेत दिनचर्या असल्यामुळे पार्क केलेल्या वाहनांची हवा सोडणे व वाहनातील साहित्य चोरी करण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे भिकाऱ्यांच्या या उपद्रवी वृत्तीला आळा बसविण्याची मागणी होत आहे.
शहरात भिकाऱ्यांचा वाढता उपद्रव
By admin | Published: May 08, 2017 12:08 AM