शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

कोरोना संकटात एसटीला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 5:00 AM

कोेरोना संसर्ग लक्षात घेता. २३ मार्च पासून एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी मध्यवर्ती बसस्थानकासह इतर सात आगारामध्ये पाच महिन्यांपासून शुकशुकाट होता. पहिल्या टप्यात महामंडळाने जिल्हातंर्गत बसेसेवा सुरू केली. २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा बसेसची वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे अमरावती, बडनेरा, परतवाडा, चांदूर बाजार, दर्यापूर, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, या आठही बसस्थानकाहून जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरून बसेसच्या फेऱ्या ये-जा करीत आहेत.

ठळक मुद्देसणसुदीमुळे दिलासा : आठ हजार प्रवाशांनी केला प्रवास, उत्पन्नही वाढले, सर्वसामान्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसला सध्या सण-उत्सवामुळे प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.काही दिवसापूर्वी महामंडळाने जिल्हातंर्गत बसेस सोडल्यानंतर आता आंतरजिल्हा बससेवा सुरू केलीे. यामध्ये मंगळवारी जिल्ह्यातील आठ आगाराच्या बसव्दारे ८,१५९ प्रवाशांनी प्रवास केलेला आहे . यापोटी महामंडळाला ५ लाख २५ हजार ६९७ रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले.कोेरोना संसर्ग लक्षात घेता. २३ मार्च पासून एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी मध्यवर्ती बसस्थानकासह इतर सात आगारामध्ये पाच महिन्यांपासून शुकशुकाट होता. पहिल्या टप्यात महामंडळाने जिल्हातंर्गत बसेसेवा सुरू केली. २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा बसेसची वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे अमरावती, बडनेरा, परतवाडा, चांदूर बाजार, दर्यापूर, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, या आठही बसस्थानकाहून जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरून बसेसच्या फेऱ्या ये-जा करीत आहेत. याचा प्रसार व प्रचार गावोगावी झाला. त्यामुळे ग्रामीणसह शहरी भागातील प्रवाशांचा लालपरीला प्रतिसाद लाभत आहे.सध्या अनेक प्रवाशी कामानिमित्त एसटी बसेसव्दारे प्रवास करीत आहे. मंगळवारी ८,१५९ प्रवाशांनी बसव्दारे प्रवास केलेला आहे. महामंडळाने दिवसभरात ३१८ फेऱ्या सोडल्या आहेत. यामध्ये प्रवाशांचा प्रतिसाद लाभल्याने दिवसभरात ५ लाख २५ हजार ६९७ रूपयाचे उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रवाशांचा दिवसेदिवस प्रतिसाद वाढत असल्याचे विभाग नियंत्रक कार्यालयाने दिलेल्या आकडेवारी वरून दिसून आले.आगार निहाय प्रवाशी संख्याअमरावती १९६१, बडनेरा १५७९, परतवाडा ९९९, वरूड १००७, चांदूर रेल्वे ७४६, दर्यापूर ६५८, मोर्शी ७१७, चांदूर बाजार ५१२ याप्रमाणे ८१५९ प्रवाशांनी प्रवास केला आहे.आंतरजिल्हा बस वाहतुक सुरू केलेली आहे. सध्या प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. बसेसला प्रवाशाचा प्रतिसाद लक्षात घेता बस फेºया सोडल्या जात आहे. मंगळवारी ५ लाखांवर उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे.- श्रीकांत गभणेविभाग नियंत्रक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी