शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

बँकेच्या अधिकारावरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली; अध्यक्ष म्हणतात अधिकाराने निर्णय

By जितेंद्र दखने | Published: August 21, 2023 8:48 PM

विरोधकांचा बहुमताचा सूर, बँकेच्या संचालक मंडळाची सभा ११ ऑगस्टला काेरमअभावी स्थगित केली होती

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्ताबदल झाल्यानंतर पहिल्याच स्थगिती करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अधिकाराच्या विषयावर सत्ताधारी आणि विरोधी संचालकांमध्ये चांगली जुंपली. यात बँकेचे अध्यक्ष म्हणतात पूर्वीच्या निर्णयानुसार अध्यक्षाचा निर्णय अंतिम राहील. मात्र विरोधात असलेले १३ संचालक म्हणतात कुठलाही निर्णय बहुमतानेच व्हावा. या विषयावर जिल्हा बँकेच्या सभेत चांगलाच कलगीतुरा रंगला होता.

 बँकेच्या संचालक मंडळाची सभा ११ ऑगस्टला काेरमअभावी स्थगित केली होती. पुन्हा ही सभा २१ ऑगस्ट रोजी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. सभेच्या प्रारंभी निवडणुकीसाठी वकिलांना दिलेल्या दोन लाखांचा हिशेब  यापूर्वीच्या संचालक मंडळाने द्यावा असा प्रश्न संचालक रविंद्र गायगोले यांनी उपस्थित केला. परंतु हा मुद्दा सर्व संचालकांच्या सहमतीने मंजूर केल्याचे बबलू देशमुख यांनी सांगितले. याशिवाय आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या विषयावर सभेत वादंग झाला. तर अध्यक्षांना मागील सभेने दिलेले विशेषाधिकार काढण्यात यावे अशी मागणी  विरोधी संचालकांनी पत्राव्दारे केली. परंतू अधिकार काढण्याचा नियम नसल्याचा मुद्दा उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी उपस्थित केला. मात्र, त्यावेळी संचालक मंडळाने हे अधिकार अध्यक्षांना बहुमताने दिले होते. आता मात्र ते आम्हाला मान्य नाही. असे विरोधक संचालकांना मान्य नसल्याचे सभेत सांगितले.तसे पत्रही सभेपूर्वीच दिले आहे. मात्र पत्र देवून चालणार नाही तर सभेत प्रत्येकांनी आपले मत नोंदवावे ते नमूद केले जाईल. बाकी अधिकार अध्यक्षांचे असल्याचा दावा यावेळी आ. बच्चू कडू यांनी केला. मात्र विरोधकांनी हा दावा फेटाळून लावला.

यावेळी सभेच्या पटलावर २९ विषय होते. यापैकी काही विषयांना विरोधकांनी मंजूरीस विरोध केला. तर काही विषय चर्चेसाठी ठेवले. तर काही मुद्यावर विरोधकांचे मत नोंदविले. सभेला अध्यक्ष आ. बच्चू कडू, उपाध्यक्ष अभिजित ढेपे, सभेला विरोधक गटातील संचालक बबलूृ देशमुख, वीरेंद्र जगताप, आ. बळवंत वानखडे, हरिभाऊ मोहोड, सुरेखा ठाकरे, सुनील वऱ्हाडे, दयाराम काळे, बाळासाहेब अलोणे, मोनिका मार्डीकर, प्रकाश काळबांडे, सुरेश साबळे, श्रीकांत गावंडे, सत्ताधारी गटातील आनंद काळे, चित्रा डाहणे, नरेशचंद्र ठाकरे, रवींद्र गायगोले, अजय मेहकरे, जयप्रकाश पटेल उपस्थित होते.