फोटो - उपोषण
तिवसा : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक कर्मचारी संघटनेच्यावतीने उपआयुक्त रोहयो कार्यालयाला मागण्यांचे निवेदन सादर केले होते. या मागण्यांची दखल न घेतल्याने ग्रामरोजगर संघटनेने तिवसा पंचायत समिती आवारात बेमुदत उपोषण थाटले आहे. या उपोषणाला आमदार रवि राणा यांनी भेट दिली.
जिल्ह्यातील कोणत्याही पंचायत समिती अंतर्गत ग्रामरोजगर सेवकांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांचे मानधन मार्च २०२१ पासून मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ग्रामरोजगर सेवकांना मिळणारे मानधन वैयक्तिक बँक खात्यावर थेट ईएफएफएमएस माध्यमातून करण्यात यावे. २०२०-२१ या वर्षातील मानधन सुधारित पद्धतीनुसार देण्यात यावे आदी मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष आशिष निस्ताने, शेषराव पाथरे, सुनील आसोडे या तिघांनी बेमुदत आमरण उपोषण थाटले आहे.