शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
2
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
3
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
4
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
5
काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
6
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
7
Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
9
श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."
10
महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?
11
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
12
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
13
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
15
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
16
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
17
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
18
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
19
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
20
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण

स्वातंत्रदिनी तरुणाईचा बेलगाम जल्लोष

By admin | Published: August 17, 2016 12:00 AM

स्वातंत्र्यदिनी तरुणाईचा बेलगाम जल्लोष अमरावतीकरांना हैराण करणारा ठरला. कर्कश हॉर्नच्या गोंगाटाने अक्षरशा नागरिक वैतागले होते.

कर्कश हॉर्नच्या गोंगाटाने नागरिक हैराण : अनेक ठिकाणी किरकोळ अपघात

अमरावती : स्वातंत्र्यदिनी तरुणाईचा बेलगाम जल्लोष अमरावतीकरांना हैराण करणारा ठरला. कर्कश हॉर्नच्या गोंगाटाने अक्षरशा नागरिक वैतागले होते. ठिकठिकाणी किरकोळ अपघात घडून अनेक जण जखमी सुध्दा झालेत. त्यामुळे असाही स्वातंत्र दिन साजरा करण्याची पद्धत तरुणाई असू शकते, असे शब्द अमरातीकरांच्या तोंडून निघालेत. या बेलगाम जल्लोषावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीसही हतबल झाल्याचे चित्र सोमवारी शहरात पहायला मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यात अनेकांनी प्राण पणाला लावलेत, स्वातंत्र्याचा लढा देत अनेक शहीद झालेत. त्यामुळे आज सर्वसामान्य स्वातंत्र्यपूर्व जीवन जगू शकत आहेत. मात्र, आधुनिक युगातील तरुणाईने स्वातंत्र्यदिनीच सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकार केलेत. सोमवारी पहाटेपासून शहरात स्वातंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. शाळा-महाविद्यालयांत शांततेचा संदेश देत झेंड्याला सलामी देण्यात आली. मात्र, सळसळणाऱ्या तरुणाईने स्वातंत्र्याची परिभाषाच बदलविल्याचे आढळले. दुचाकींचे ताफेच्या ताफे रस्त्यावर भरधाव चालवून कर्कश हॉर्नचा गोंगाट करीत भन्नाट तरुणाईने शहरात उच्छादच मांडल्याचे चित्र पहायला मिळाले. या कर्कश हॉर्नमुळे अनेकांच्या कानठळ्यासुध्दा बसल्या होत्या. मात्र, या तरुणाईच्या जल्लोषाला थांबविणारी पोलीस यंत्रणाच कुचकामी झाली होती. शहरातील प्रत्येक मार्गावर दुचाकीस्वाराच्या हॉर्नचा गोंगाट सहन करण्यासारखाच नव्हता. दुचाकींचे ताफे भरधाव रस्त्यावरून जात असताना कोणीही आडवे आल्यास त्याला धडक देत समोर जायचे. हा प्रकारही अनेक ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र, हा दुचाकीस्वारांच्या हैदासाला थांबविणारी पोलीस यंत्रणा केवळ बघ्याची भुमिका घेऊन उभी होती. अनेक ठिकाणी तर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांनी हैदोसच घातला होता. जीवाची पर्वा न करीत तरुणाचा हा जल्लोष अमरावतीकरांच्या स्मरणात राहण्यासारखाच आहे. त्यामुळे स्वातंत्र दिनाचा असाही जल्लोष असू शकतो, असे शब्द अमरावतीकरांच्या मुख्यातून आपसूक निघत होते. शहरात २२ ठिकाणी किरकोळ अपघात बेलगाम दुचाकीस्वारांच्या कल्लोळात शहरातील २२ ठिकाणी किरकोळ अपघात झाल्याची माहिती आहे. इर्विन चौकात बुलेट रॅलीदरम्यान एक दाम्पत्याच्या दुचाकीला कट बसला आणि ते दाम्पत्या चिमुकल्यासह खाली कोसळले. नवाथे नगरात दोन दुचाकीस्वार भरधाव वेगाने नाल्यात कोसळले. राजकमल चौकात सुध्दा चार ते पाच दुचाकी घसरल्या. पंचवटी चौकातसुध्दा दुचाकींची समोरासमोर धडक झाली. असे प्रकारचे २२ अपघात शहरात घडलेत.जल्लोषासाठी ट्रॅफिक जामदुचाकीस्वाराचा सोमवारी संपूर्ण शहरात जल्लोष दिसून आला. शेकडो तरुणाईने रस्त्यावरच वाहने उभे करून हॉर्नचा गोंगाट व जल्लोष केला. संपूर्ण रस्ता अडवून हा जल्लोष सुरु असल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामसुध्दा झाली होती. याबाबत अनेक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्कही केला. मात्र, पोलीस विभागाकडून तत्काळ मदत मिळाली नाही, असे प्रकार अनेक ठिकाणी घडले. स्वातंत्र्यदिनी शहरातील मिरवणुका, वाहतुकीची कॅमेराद्वारे छायाचित्रिकरण करण्यात आले आहे. ज्या वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल, ते छायाचित्रिकरणातून उघड होईल. यामध्ये दोषी वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती.