अमरावतीत खासदारांचे निलंबना विरोधात इंडीया आघाडीची निदर्शने

By जितेंद्र दखने | Published: December 22, 2023 05:18 PM2023-12-22T17:18:53+5:302023-12-22T17:22:22+5:30

राजकमल चौकात आंदोलन, मोदी सरकारविरोधात घोषणबाजी.

India Aghadi protests against suspension of MPs in Amravati | अमरावतीत खासदारांचे निलंबना विरोधात इंडीया आघाडीची निदर्शने

अमरावतीत खासदारांचे निलंबना विरोधात इंडीया आघाडीची निदर्शने

जितेंद्र दखने ,अमरावती : लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या तब्बल १४६ खासदारांना निलंबित केल्याबद्दल इंडिया आघाडीने येथील राजकमल चौकात शुक्रवारी केंद्रातील भाजप सरकार विरोधात निदर्शने आंदोलन केले. यावेळी केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना (उबाठा), आम आदमी पक्ष यांनी तीव्र निषेध केला. यावेळी आंदोलनात तुकाराम भस्मे, मिलिंद चिमोटे, अशोक सोनारकर, सुभाष पांडे, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, प्रदेश सचिव भैया पवार, अभिनंदन पेंढारी, माजी महापौर मिलिंद चिमोटे, वैभव देशमुख, निळकंठ ढोके, जे. एम. कोठारी, सुनील देशमुख, रमेश सोनुले, राजेंद्र भांबोरे, ओमप्रकाश कुटेमाटे, शरद मंगळे, विजय खंडारे, सुधीर देशमुख, आशा अगम, प्रकाश पहुरकर, संकेत साहू, अंजली उघडे, शेरेकर, बी. टी. अंभोरे, दिगंबर नगेकर, चंदा वानखेडे, आशा वैद्य, सुरेंद्र देशमुख, किशोर देशमुख, कांचन खोडके, दिनेश खोडके, विजय बर्वे, निलू मेश्राम, रेहाना यास्मिन, पद्मा गजभिये, जयेंद्र भोगे, उद्धव कणसे, ज्ञानेश्वर मेश्राम, सुभाष गोहत्रे, सफिया खान, प्रकाश पहुरकर, संजय बोबडे, किशोर खोब्रागडे, सुभाष गाेहत्रे आदी सहभागी झाले होते.

Web Title: India Aghadi protests against suspension of MPs in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.