२८एएमपीएच०३
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : जागतिक युवा धनुर्धर अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात भारताला दोन कांस्यपदके मिळवून देणाऱ्या मंजिरी मनोज अलोनेच्या यशात तिच्या बहिणीचाही वाटा मार्गदर्शकाप्रमाणेच आहे.
मंजिरी ही काल-परवापर्यंत अगदी सर्वसामान्य मुलगी होती. मात्र, पोलऺंड येथील जागतिक युवा धनुर्धर अजिंक्यपद स्पर्धेने तिचे आयुष्य बदलले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला एकाच स्पर्धेत दोन पदके तिने मिळवून दिली. ही ओळख घडण्यामागे तिची बहीण समीक्षा अलोने हिचादेखील वाटा आहे. खासगी शाळेत लिपिक वडील मनोज अलोणे यांनी समीक्षाला नेमबाजीची गोडी लावली. नांदगाव खंडेश्वर येथे धनुर्विद्येचे धडे घेणाऱ्या एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीच्या खेळाडूंमध्ये समीक्षाचा समावेश होता. ती राष्ट्रीय पातळीवर खेळली. तिने सुवर्णपदकदेखील पटकावले आहे. मात्र, यानंतर ती अभ्यासाकडे वळली. अभ्यास आणि इतर कारणांमुळे तिने सराव थांबविला. मात्र, मंजिरीला एकलव्यमध्ये प्रवेश दिला.
आता १५ वर्षांची असलेल्या मंजिरीने बाराव्या वर्षी अकादमीत प्रवेश घेतला. यापूर्वी ती नांदगावातच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. मात्र, खेळाकडे लक्ष देण्यासाठी तिला मराठी माध्यमात टाकले. मंजिरीची उंची आणि शारीरिक प्रमाणबद्धता धनुर्विद्या या क्रीडा प्रकारासाठी योग्य असल्याचे लक्षात घेऊन एनआयएस प्रशिक्षक अमर जाधव यांच्या मार्गदर्शनात तिच्याकडून कसून सराव करून घेण्यात आला. धनुर्विद्येतील तिची अचूकता ३६०/३३० अशी उत्कृष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. विविध पातळ्यांवरून तिची पोलंड येथे जागतिक युवा धनुर्धर अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली. येथे तिने सर्व कौशल्य पणाला लावत १५ ऑगस्ट रोजी वैयक्तिक गटात आणि पाठोपाठ १६ ऑगस्ट रोजी सांघिक गटात कांस्यपदक मिळविले. या यशापाठोपाठ मिळणाऱ्या सत्कार समारंभानंतर ती पुन्हा एकलव्य क्रीडा अकादमीच्या मैदानावर सराव करीत आहे.
------------------
मंजिरीचे यश अतुलनीय आहे. लक्ष्य साधण्यासाठी लागणारी एकाग्रता व अचूकता तिच्याकडे आहे. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करेल आणि पदक मिळवून देईल, अशी अपेक्षा आहे.
- सदानंद जाधव, संस्थापक, एकलव्य क्रीडा अकादमी
-------------
हरियाणातील दोन मुलींसमवेत मी साघिक काऺंस्यपदकासाठी झुंज दिली. पोलऺंड येथील स्पर्धेदरम्यान माहोल वेगळाच होता. आम्ही प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची बोलू शकलो नसलो तरी त्यांचे तंत्र, देहबोली यांचा अभ्यास जरूर केला. त्याचा पुढील कालखंडात निश्चित फायदा होईल.
- मंजिरी अलोने, खेळाडू