- गणेश वासनिकअमरावती - धावत्या गाडीत किंवा प्लॅटफार्मवर प्रवाशांची तब्येत खराब झाल्यास वेळीच उपचार न मिळाल्याने यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सुसज्ज आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता एमबीबीएस, एमडी डॉक्टरांकडून मागविले प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
प्रवाशांची गर्दी आणि मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्यांची आवक-जावक असलेल्या रेल्वे स्थानकावर आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा हा उपक्रम राबविला जाणार आहे. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना यात प्राधान्य दिले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने विभाग आणि रेल्वे स्थानकांची नावे जाहीर केली आहे. येथे आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा देण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव डॉक्टरांकडून मागविले जात आहे. त्यामुळे येत्या काळात धावत्या गाडीत वा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास तत्क्षण खासगी वैद्यकीय उपचार घेता येईल, अशी नवी संकल्पना आहे. विशेषत: जंक्शन रेल्वे स्थानकांवर आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा मिळणार आहे.
या रेल्वे स्थानकावर मिळेल वैद्यकीय सेवामध्य रेल्वे भुसावळ विभागातंर्ग़त नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, अकोला आणि बडनेरा रेल्वे स्थानकावर दवाखाना साकारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी सुसज्ज आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ईच्छुक डॉक्टरांना आयआरईपीएस या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. लवकरच नागपूर रेल्वे विभागातील महत्वाच्या रेल्वे स्थानकावर आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवेला प्रारंभ होणार आहे.
दवाखाना, फॉर्मसीसाठी जागा मिळेलरेल्वे स्थानकावर दवाखाना, फॉर्मसीसाठी प्रशासन जागा उपलब्ध करून देणार आहे. त्याकरिता जागेचे शुल्क आकारले जातील, अशी निविदेत अट आहे. हा सुसज्ज दवाखाना, फॉर्मसी रेल्वे स्थानक वा परिसरातच असेल, अशी जागेची व्यवस्था रेल्वे प्रशासन करून देईल, तशा सूचना वरिष्ठांच्या आहेत.
बाह्यरूग्ण सेवा असेलएमबीबीएस, एमडी डॉक्टरांकडून बाह्यरूग्ण सेवा देण्याबाबत प्रस्ताव मागविले आहे. दवाखान्यासोबत फॉर्मसीची सुविधा असणार आहे. प्रवाशांची तब्येत खराब झाल्यानंतर काही वेळातच संबंधितांना उपचारासाठी सोय व्हावी, असे आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवेचे स्वरूप आहे. रेल्वे प्रशासनाने आकारलेल्या शुल्कानुसारच डॉक्टरांना खासगी वैद्यकीय सेवेचे शुल्क प्रवाशांकडून घ्यावे लागणार आहे.
रेल्वे स्थानकावर आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवेबाबत २८ जुलै रोजी नोटिफिकेशन निघाले आहे. वेबसाईटवर प्रस्ताव मागविले आहे. डॉक्टरांना रेल्वेच्या अटी, शर्ती लागू असणार आहे. - डी. एल. मिना, निरीक्षक, खंड वाणिज्य बडनेरा रेल्वे