शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रेमंडद्वारा देशातील सर्वाधिक गुंतवणूक अमरावतीत - देवेंद्र फडणवीस

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 10, 2023 5:47 PM

पीएम मित्रा टेक्सटाइल पार्क भूसंपादनसंदर्भात आढावा

अमरावती : पीएम मित्रा योजनेंतर्गत देशात सात मेगा टेक्सटाइल पार्क मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील एकमेव प्रकल्प नांदगाव पेठ येथील अतिरिक्त एमआयडीसीमध्ये होत आहे. येथे रेमंड उद्योग देशातील सर्वांत मोठी गुंतवणूक करणार आहे व याशिवाय अन्य पाच ते सहा प्रकल्पदेखील येथे येत असल्याची माहिती पालकमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.

केंद्र शासनाद्वारा मंजूर करण्यात आलेल्या या टेक्सटाइल पार्कच्या भूसंपादनासंदर्भात येथील नियोजन भवनात फडणवीस यांनी आढावा घेतला. सन २०२७-२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. एक हजार हेक्टरमध्ये हा प्रकल्प आहे. यातील ४१३ हेक्टर जागा आवश्यक आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पिंपळविहीर येथील २४२.८९ हेक्टर व दुसऱ्या टप्प्यात पिंपळविहीर व डीगरगव्हान येथील १७०.१८ हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात येत आहे. यासाठी १६३ कोटींचा शासन निधी देण्यात आलेला आहे. एक आठवड्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत असल्याचे फडणवीस म्हणाले.बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत तसेच उद्योग व वस्त्रोद्योग सचिवांनी ऑनलाइन सहभाग घेतला

टॅग्स :businessव्यवसायDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmravatiअमरावतीRaymondरेमंड