लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेला अपंग कल्याण व पुनर्वसनाचा निधी त्वरित अपंगाच्या खात्यावर जमा करावा या मागणीसाठी बुधवारी अपंग जनता दलाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुळकर्णी यांच्या दालनात ठिय्या दिला.राज्य शासनाच्या निर्णयानुसार व उच्च न्यायालयाचा आदेशाप्रमाणे अपंग कल्याण व पुनर्वसन निधी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने सन २०१६ ते २०१७ मधील ७० लाख रुपयांचा निधी अखर्चितरित्या पडून आहे. याकडे प्रशासनाचे जाणीवर्पूक दुर्लक्ष आहे. सदर निधी अपंगाना वितरित करण्यात यावा, अशी मागणी वारंवार प्रशासनाकडे केल्यानंतरही त्याची दखल घेतली नसल्याने बुधवारी अपंगांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनात शेख अनिस, राजिक शहा, कमलेश गुप्ता, सुरेश वैष्णव, शेख बब्बू, जहीर खान, राजेंद्र घाटोळे, विजय हेले, प्रभाकर राऊत, नासीर बेग आदीचा सहभाग होता.
सीईओंच्या दालनात अपंगाचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 9:52 PM
प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेला अपंग कल्याण व पुनर्वसनाचा निधी त्वरित अपंगाच्या खात्यावर जमा करावा ......
ठळक मुद्देआंदोलन : अंपग कल्याण व पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा