कुऱ्हा : तिवसा तालुक्यातील कुऱ्हा परिसरातील शेतकऱ्यांच्या कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
एकीकडे कपाशीचे पीक धोक्यात आले असताना सोयाबीनवरसुद्धा खोडकिडा नावाच्या रोगाने पछाडले असून, हे पीक हाती येईल की नाही, असा प्रश्न बळीराजासमोर उपस्थित झाला आहे. या भागात संत्रासुद्धा जोरात असून बराच शेतकऱ्यांचे भविष्य संत्रापिकांवर असतात. परंतु, काही प्रमाणात आंबिया बहर आलेला असून त्यातही निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस कधी कमी व जास्त यातही असलेल्या संत्रा बागायती शेतकऱ्यांच्या आंबिया बहराचे संत्राफळ गळणे सुरू आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरीसुद्धा चिंतेत सापडला आहे. कारण संत्रा बागायतीकरिता किती तरी खर्च करावा लागतो. त्यातही काही मोजक्या शेतकऱ्यांच्या शेतीमधील आंबिया बहराचे संत्रा फळगळ होत आहे. त्यामुळे हेही पीक धोक्यात दिसत आहे. तेव्हा कुऱ्हा परिसरातील बळीराजा (शेतकरी) आलेल्या सोयाबीन, कपाशी व बागायती संत्रा आणि इतर पिकेसुद्धा नापिकीच्या छायेत दिसून येत आहे. तेव्हा संबंधित कृषी विभागाने याकडे लक्ष वेधून आलेल्या रोगासंबंधी विचार मार्गदर्शन करावे, अशी मागणी तिवसा तालुक्यातील कुऱ्हा परिसरातील बळीराजा शेतकऱ्यांची आहे. काही तरी तोडगा काढावा, असेही मत बळीराजा व्यक्त करीत आहेत.