अमरावती : मान्सून सक्रिय होण्याच्या वार्तेनंतर पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आमिष दाखवून प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे अनधिकृत व्यक्तींद्वारा विकण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. जून महिन्यात तीन ठिकाणी धाड टाकून ५०० पाकिटे जप्त करण्यात आली असली. तरी या विक्रेत्यांद्वारा जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना विक्री केल्याचे वास्तव आहे.
एका प्रकरणात या बियाणांचे धागेदोरे गुजरात राज्याशी जुळल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे, तर काहींनी कापसाची गलाई करून येथेच पाकिटे तयार करून वेगवेगळ्या नावाने शेतकऱ्यांना विकले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता आहे. तणनाशक सहनशील जीन असल्याचे सांगत शेतकऱ्यांना विक्री केली जात आहे. यंदा कपाशीची क्षेत्रवाढ होणार असल्याने बोगस काही विक्रेत्यांचे दलाल याकामी सक्रिय झाल्याचे काही घटनांवरून स्पष्ट होत आहे.
यवतमाळ व वर्धा जिल्हा सीमेलगत असणारा धामणगाव तालुका व एमपी सीमेलगतच्या वरूड, मोर्शी तालुक्यात या बियाणांची घुसखोरी झालेली आहे. महामार्गाने हे बियाणे या भागात येते व जिल्हा सीमेलगच्या भागात यांचे बस्तान असल्याचे आतापर्यंतच्या प्रकरणांवरून उघड झालेले आहे.
जून महिन्यातील कारवाया
२ जून : मोर्शी तालुक्यात नेरपिंगळाई येथे ५० पाकिटे१८ जून : अमरावती येथे विक्रेत्याजवळ व घरून ४४२ पाकिटे