अमरावती : खरिपाच्या नापिकीचा परिणाम बाजार समितीतील आवकवर झाला आहे. बुधवारी ७ हजार ३९५ पोत्यांची आवक झाली आहे. यामध्ये सोयाबीनची ६८२८ पोत्यांचा समावेश आहे. कापसाला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळाला. फळबाजारात संत्रा व मोसंबीची वाढती आवक असताना भाव पडले असून भाजीबाजारातही कांदा, बटाटे व लसणाची आवक वाढली आहे. अमरावती बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस शेतमालाची आवक कमी होत आहे. बुधवारी ७ हजार ३९५ पोत्यांची आवक बाजार समितीत झाली. सर्वाधिक आवक ६८२८ पोते सोयाबीनची आहे. २७५० ते ३३३२ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. कापसाची २१० क्विंटल आवक झाली. हमीभाव ४०५० रुपये प्रती क्विंटल असताना ३९२५ ते ४०२५ रुपये भाव मिळाला आहे. हमीभावापेक्षाही कमी भाव मिळाला आहे. गहू १०७ क्ंिवटल, तूर २५० क्ंिवटलची आवक झाली. हरभरा मात्र निरंक राहिला. धान्याची आवक कमी होत असताना भाजीपाल्याची वाढती आवक आहे. सोमवारी गावरान पांढरा कांद्याची ४०० क्विंटल, नाशिकच्या लाल कांद्याची २०० क्विंटल, पांढरा आलू ४०० क्ंिवटल, लाल आलू ४०० क्ंिवटल, लसन ७०० क्ंिवटल, अद्रक १०० क्ंिवटल अशी आवक झाली आहे. मिरची, हिरवी मिरची, सिमला मिरची, कोहळं, भेंडी, गवार, गांजर यांची प्रत्येकी १० क्ंिवटलच्या आसपास आवक झाली. फळप्रकारात संत्रा ७० क्ंिवटल, मोसंबी २० क्ंिवटल, चिकू ६ क्ंिवटल, सफरचंद ७ क्ंिवटल, पेरु ६ क्ंिवटल व बोराची १ क्ंिवटल आवक झाली आहे. (प्रतिनिधी)
फळभाज्यांची आवक वाढली
By admin | Published: January 15, 2015 10:44 PM