शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
2
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
3
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
4
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
5
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
6
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
7
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
8
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
9
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
10
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
11
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
12
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
13
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
14
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
15
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
16
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
17
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
18
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
19
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी

झेडपीतील पदभरती प्रक्रियेची माहिती मिळणार हेल्पलाईन क्रमांकावर

By जितेंद्र दखने | Published: April 17, 2023 4:12 PM

प्रशासनाला सूचना : शंका निरसन करण्यासाठी उपाययोजना

अमरावती :जिल्हा परिषदांमधून होणाऱ्या पदभरती बाबत उमेदवारांना मिळणारी उडवाउडवीची उत्तरे लक्षात घेता. त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रत्येक जिल्हा परिषदांमधून पदभरती होईपर्यत हेल्पलाइन क्रमांक सुरू केले जाणार आहेत. या क्रमांकावर उमेदवारांनी भरती प्रक्रियेची विस्तुत माहिती मिळणार आहे.

दरम्यान शासनाने सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत दोन वर्षाची शिथिलता दिली आहे. तसेच जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची बिंदू नामावली अंतिम केली आहे. त्यानंतर आता आय.बी.पी.एस कंपनीद्वारे आपलिकेशन पोर्टल विकसित करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर राज्यात एकाच वेळी परीक्षा घेण्यासाठी सदर कंपनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतन,अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाडेतत्त्वावर देणारी शिफारस सचिव समितीने केली आहे. अशातच सध्या जिल्हा परिषदेतील पदभरतीच्या प्रक्रियेकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.विविध संवर्गातील पदांसाठी होणार भरती

राज्य स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा शासनाकडून ७५ हजार पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी शासन स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्राम विकास विभागाचे अखत्यारित जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील तसेच आरोग्य व इतर विभागातील विविध संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला असून त्यामधून १८ हजार ९३९ पदे भरली जाणार आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावतीjobनोकरी