ठराव पारित : जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा निर्णयअमरावती : जिल्ह्यात दिवसेंदिवस नापिकी व कर्ज बाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे अशा प्रकाराला आळा घालणे आवश्यक आहे.मानवतेच्या भावनेतून जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव बुधवारी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेत एकमताने पारित करण्यात आला. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांची सभा कर्मचारी युनियनच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभेत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटंूबाला युनियन मार्फत आर्थिक मदत करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांच्यावतीने निधी गोळा करून हा निधी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला वितरित केला जाणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे मेळघाटातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बूट वाटप करण्याचाही निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या प्रशासन व शासनस्तरावर प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. युनियनच्या जमा खर्चाचा आढावाही सभेत घेण्यात आला. याचवेळी युनियनचे सरचिटणीस तुषार पावडे यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिल्याने त्याचा राजीनामा एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या या पदावर जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी समीर चौधरी यांची युनियनच्या सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली. सभेला अध्यक्ष पंकज गुल्हाने, कोषाध्यक्ष प्रशांत धर्माळे, मागदर्शक ज्ञानेश्र्वर घाटे, वाय.बी. देशमुख, श्रीनिवास उदापुरे, राजेश रोंघे, समीर चौधरी, गजानन गोहत्रे, नीलेश तालन, राजेश पवार, नितीन माहोरे, रूपेश देशमुख, मंगेश मानकर, श्रीकांत मेश्राम, अशोक थोटांगे, विजय कविटकर, नितिन बद्रे, जयंत पाठकल विजय कोठाळे, लिलाधर नांदे, समिर लेंडे, ऋषीकेश कोकाटे, एम.एम. बोमाटे, बाळासाहेब मोथरकर, एस.एम दिवे, राजू गाडे व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी पुढाकार
By admin | Published: December 26, 2015 12:22 AM