तिवसा : तालुक्यातील कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सालोरा (तसरे) गावात जुन्या वादातून २७ फेब्रुवारीला पोलीस पाटील व दोन गटांत हाणामारी झाली होती. यात जखमी झालेल्या इसमाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सालोरा (तसरे) गावात तणाव वाढला आहे. यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
गुणवंत हरी चव्हाण (४०) यांचा उपचारादरम्यान इर्विनला मृत्यू झाला. सालोरा (तसरे) च्या पोलीस पाटील छबू चव्हाण, लोकेश जाधव, जीवन जाधव व रामदास जाधव (रा. सालोरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्यांना १ जानेवारी रोजी अटक करून त्यांना जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यांच्यावर सुरुवातीला कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुन्या वादातून हा वाद घडला. त्याचे हाणामारीत रूपांतर झाले होते. आज यात एकाच मृत्यू झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे कुºहा पोलिसांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे