शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

राज्यातील १८ हजार प्रयोगशाळा कर्मचा-यांवर अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 5:18 PM

केंद्र शासनाच्या कर्मचा-यांना देण्यात येत असलेल्या वेतनश्रेणीप्रमाणे राज्य शासनाने वेतन आयोगाकडे शिफारस केली. अद्यापही तीन आयोगाच्या त्रुटी अपूर्णच असल्याने राज्यातील तब्बल १८ हजार प्रयोगशाळा कर्मचा-यांवर अन्याय होत आहे़ सातवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी या त्रुटी दूर करण्याची मागणी या कर्मचा-यांनी केली आहे.

- मोहन राऊतअमरावती - केंद्र शासनाच्या कर्मचा-यांना देण्यात येत असलेल्या वेतनश्रेणीप्रमाणे राज्य शासनाने वेतन आयोगाकडे शिफारस केली. अद्यापही तीन आयोगाच्या त्रुटी अपूर्णच असल्याने राज्यातील तब्बल १८ हजार प्रयोगशाळा कर्मचा-यांवर अन्याय होत आहे़ सातवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी या त्रुटी दूर करण्याची मागणी या कर्मचा-यांनी केली आहे.राज्यातील माध्यमिक शिक्षण विभागात ९ हजार ७३२ प्रयोगशाळा सहायक आणि ९ हजार ६५४ प्रयोगशाळा परिचर ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या प्रयोगात मदत करतात़ मात्र, या कर्मचाºयावर वेतन आयोगाकडून सतत अन्याय होत आहे़ तीन आयोगात अन्यायचौथ्या वेतन आयोगात राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील प्रयोगशाळा सहायकांना ९७५-२५-११५०-३०-१५४० अशी वेतनश्रेणी मिळाली, तर केंद्राकडून १२००-३०-१४४०-४०-२०४० अशी वेतनश्रेणी होती. पाचव्या वेतन आयोगामध्ये राज्यातील प्रयोगशाळा सहायकांना ३२००-८५-४९०० अशी वेतनश्रेणी राज्य शासनाने दिली होती़ केंद्राने याच आयोगात ४०००-१००-६००० अशी दिली़ सहाव्या वेतन आयोगात राज्यातील प्रयोगशाळा सहायकांना ५२००-२०२०० वेतनबँड व २००० रुपये ग्रेड पे अशी वेतनश्रेणी मिळाली़ केंद्राने या वेतन आयोगात २४०० रुपये ग्रेड पे दिला होता. वेतनश्रेणीतील तफावत दूर करून मोबदला द्यावा, कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी वेतन आयोगाकडे आजही धूळखात पडली आहे़

विभागाची शिफारस, आयोगाचा वेळकाढूपणा केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील प्रयोगशाळा सहायक व परिचर यांना वेतनश्रेणी देण्यात यावी, अशी शिफारस गतवर्षी शिक्षण संचालक व शिक्षण सचिवाने वेतन आयोगाकडे केली होती़ मागील तीन आयोगांतील त्रुटी दूर करून त्यांना मोबदला देण्याचेही नमूद केले होते़ परंतु, वेतन आयोग वेळकाढू धोरण स्वीकारत असल्याचा आरोप प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेने केला आहे़

तीन आयोगांत प्रयोगशाळा सहायक व परिचरावर सतत अन्याय होत आहे़ ज्या कर्मचाºयांनी न्यायालयात दाद मागितली, त्यांना न्याय मिळतो़ मात्र, शिक्षण विभागाने वेतन आयोगाकडे शिफारस करूनही आमच्या वेतनश्रेणीतील त्रुटी अद्यापही दूर केल्या नाहीत़- भरत जगताप, राज्य अध्यक्ष, प्रयोगशाळा कर्मचारी संघटना

टॅग्स :Employeeकर्मचारीAmravatiअमरावती