अमरावती : तत्कालीन महापालिका आरोग्य अधिकारी श्यामसुंदर सोनी यांना आंदोलनादरम्यान मारहाण केल्याच्या प्रकरणात युवा सेनेचे राहुल माटोडे यांच्यासह पाच शिवसैनिकांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
२०१५ मध्ये शिवसैनिकांनी आंदोलनदरम्यान तत्कालीन आरोग्य अधिकारी श्यामसुंदर सोनी यांना मारहाण करून तत्कालीन आयुक्तांसमोर ओढत आणल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या प्रकरणात पाच शिवसैनिकांविरुध्द सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. गेल्या सहा वर्षांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्याचा निकाल गुरुवारी न्यायालयाने दिला. निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या शिवसैनिकांमध्ये राहुल माटोडे, ललित झंझाड, नीलेश सावळे, शैलेश चव्हाण, अतुल थोटांगे यांचा समावेश आहे. आरोपीच्यावतीने न्यायालयात वकील राजेश देशमुख यांनी कामकाज पाहिले.
00000000000000000
जलशुध्दीकरण केंद्रासमोरून दुचाकी लंपास
अमरावती : राजुरा स्थित जल शुध्दीकरण केंद्रासमोरून एका इसमाची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. सचिन विलास काकडे (३४ रा. अर्जुननगर) हे एमएच २७ सीएल ८८९१ या क्रमांकाची दुचाकी घेऊन पारधी बेड्यावर गेले होते. परंतु दुचाकी बंद पडल्यामुळे त्यांनी ती राजुरा स्थित जलशुध्दीकरण केंद्राजवळ उभी केली. त्यानंतर पायदळ घरी गेले. सचिनने घटनेची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली.
000000000000000000000000
न्यू सावजी बार ॲन्ड रेस्टारंट फोडले
अमरावती : नवसारी स्थित न्यू सावजी बार ॲन्ड रेस्टारंट फोडून चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि शीतपेयाच्या बॉटल्स असा एकूण दोन हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवारी उघडकीस आली. सागर रामदास शिरभाते (रा. तारखेडा) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी सुनील तितपुरे (रा. नवसारी) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला.