लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ भारिप-बमसंचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाप्रमाणे विविध संघटनांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता. यादरम्यान शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांवर भ्याड हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांची चौकशी करू न आंदोलकांविरुद्ध पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी शुक्रवारी खा. आनंदराव अडसूळ यांच्या लेटरहेडवर जिल्हाप्रमुख संजय बंड व अन्य पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.बुधवार, ३ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर स्वत:हून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. असे असताना शहरासह जिल्ह्यात बंद व्यापारी प्रतिष्ठानांवर काही आंदोलकांनी दगडफेक करू न साहित्याची नासधूस केली आहे. एवढेच नव्हे तर व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही अकारण मारहाण केली. पोलीस प्रशासनाच्या खड्या पहाºयात जमावातील बंडखोरांनी केलेल्या तोडफोडीबाबत जिल्हा प्रशासनाने चौकशी करू न कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्वरित कारवाई न केल्यास व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला. यावेळी सहसंपर्कप्रमुख ज्ञानेश्वर धाने पाटील, जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, सुनील खराटे, महानगरप्रमुख प्रशांत वानखडे, शहरप्रमुख प्रवीण हरमकर, नरेंद्र केवले, उपशहरप्रमुख अमोल निस्ताने, संघटक शोभा गायकवाड, मनीषा टेंभरे, वर्षा भोयर, शोभा लोखंडे, नाना नागमोते, रेखा खारोडे, शारदा पेंदाम, सुनील राऊत, राहुल माटोडे आदी उपस्थित होते.
भ्याड हल्ल्यांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:34 AM
कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ भारिप-बमसंचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाप्रमाणे विविध संघटनांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता. यादरम्यान शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांवर भ्याड हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
ठळक मुद्देशिवसेना : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना साकडे