मागणी : लहुजी शक्ती सेनेचे पालकमंत्र्यांना निवेदन अमरावती : पिंपळखुटा आश्रम परिसरातील शाळेत प्रथमेश सगणे या विद्यार्थ्यावर झालेल्या नरबळीच्या प्रयत्नाच्या पार्श्वभूमिवर आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्यासह सहकाऱ्यांची चौकशी करून खऱ्या गुन्हेगाराला अटक करावी व या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, या मागणीचे निवेदन लहुजी शक्ती सेनेच्यावतीने पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या माध्यमातून गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना पाठविण्यात आले. सागर पात्रे, अजय वणवे, प्रथमेश सगणे अशा अनेक विद्यार्थ्यांसोबत घातक घटना घडल्या आहेत. सागर पात्रे याचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणांची नेमकी चौकशी होण्यासाठी सीबीआयकडे हे प्रकरण सोपविणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे. अध्यात्माचे धडे ज्या आश्रमशाळेतून दिले जातात आणि ज्या ठिकाणी पालक मोठ्या विश्वासाने आपली मुले पाठवितात, तेथे जर गोरगरिब मुलांसोबत असा क्रूर प्रकार घडत असेल तर जबाबदारी कोणाची? त्यामुळेट्रस्टी शिरीष चौधरी, शंकरबाबा व सहकाऱ्यांना अटक करून प्रथमेशसह अन्य मुलांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून सुरेश स्वर्गे, लहुजी शक्ती सेनेचे विदर्भाध्यक्ष रूपेश खडसे, सचिन खिराडे आदींनी केली आहे.
शिरीष चौधरींसह शंकर महाराजांची चौकशी करा
By admin | Published: September 20, 2016 12:20 AM