लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराची आगामी काळातील वाढ लक्षात घेऊन अमृत योजनेंतर्गत मंजूर पाणीपुरवठा प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोट यांनी शनिवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांना दिले.प्राधिकरणाच्या नव्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाची पाहणी अधीक्षक अभियंता चारथळ, कार्यकारी अभियंता जवंजाळ आदी यावेळी उपस्थित होते. प्रकल्पासह प्राधिकरणाच्या विविध कामांचा आढावाही यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला. शहराची आगामी काळातील वाढ व लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकाळ पाणीपुरवठ्याचे नियोजन या प्रकल्पाद्वारे होत आहे. हे काम मुदतीत पूर्ण झाले पाहिजे. त्याचप्रमाणे, पाण्याची बचत करण्याविषयी नागरिकांमध्ये जागृतीही घडवून आणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जागृती, कारवाई आदी उपायांचा अवलंब करावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.जलकुभांची कामे प्रगतीपथावरया प्रकल्पामुळे आगामी काळात १० लाख ४५ हजार लोकसंख्येला पाणी पुरविणे शक्य होईल. ६१ एमएलटीचा साठा शक्य आहे. सध्या होणारा प्रतिदिन १०८ दशलक्षलीटर पाणीपुरवठा प्रस्तावित योजनेनुसार १३५ दशलक्ष लीटरपर्यंत वाढणे शक्य आहे. बडनेरा जुनी वस्ती, नागपुरी गेट, खोलापुरी गेट, नवसारी, पार्वतीनगर, बेनोडा ट्रेन्च, मजीप्रा परिसर, रहाटगाव, म्हाडा, मालटेकडी, तपोवन व जलशुद्धीकरण केंद्र येथे उंच जलकुंभाचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील नवीन वितरण नलिकांचे काम ७६.१२ किमी, तर जुनी वितरण नलिका बदलविण्याचे काम ३२.६ किमी पूर्ण झाले आहे.
‘अमृत’ प्रकल्पाची पालकमंत्र्यांद्वारा पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 9:39 PM
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराची आगामी काळातील वाढ लक्षात घेऊन अमृत योजनेंतर्गत मंजूर पाणीपुरवठा प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोट यांनी शनिवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांना दिले.प्राधिकरणाच्या नव्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाची पाहणी अधीक्षक अभियंता चारथळ, कार्यकारी अभियंता जवंजाळ आदी यावेळी उपस्थित होते. प्रकल्पासह प्राधिकरणाच्या विविध कामांचा आढावाही यावेळी ...
ठळक मुद्देमुदतीत काम पूर्ण करावे : मजीप्राच्या अधिकाºयांना निर्देश