नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली. वेणी गणेशपूर येथील आदितापूर तलावाच्या भिंतीला अतिवृष्टीमुळे भगडाद पडल्याने शेतात पाणी शिरले. त्यामुळे नुकसानाची पाहणी वीरेंद्र जगताप यांनी केली. ज्यांच्या घरात व शेतात पाणी शिरले त्यांना नुकसान भरपाईची मागणी तहसीलदारांकडे केली.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आजनी, फुलआमला, टाकळी परिसरातील पीक नुकसानीची पाहणी आ. वीरेंद्र जगताप यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी केली. यावेळी सचिन रिठे, मंगेश जोगे, पोलीस पाटील प्रदीप इतपुरे, गजानन बोकडे, डॉ. प्रमोद काठाळे, दामू कानोडे, राहुल गवाले, उमेश लांजेवार, कल्पना नागदिवे, प्रवीण हंबर्डे, रोहित जयस्वाल, राजू हंबर्डे, सचिन जोगे, सरफराज पठाण, गजानन भस्मे, रमेश चवरे, शिवाजी चव्हाण, मुन्ना सुरोंसे, दीपक सवाई, प्रवीण सवाई, श्याम मंत्री, सुनील राऊत, प्रवीण कांडलकर, बाळासाहेब कांडलकर, विजय मंत्री, बबलू आडे, संजय घोंगडे, विश्वास राऊत, गजानन खंडारे, सुभाष पांडे, रामेश्वर राऊत, प्रभुदास इंगोले, संतोष चौधरी, अमोल आमले, प्रफुल ठाकरे व शेतकरी मंडळी उपस्थित होती.
100921\img-20210908-wa0009.jpg
माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी.