अमरावती : महापौर चेतन गावंडे यांनी सोमवारी वडाळी नाला, मोर्शी रोडवरील नाला गाडगेनगर, प्रशांतनगर नाला, अंबादेवी गांधी चौक नाल्याची पाहणी केली. सफाईची कामे जलद गतीने करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
या परिसरातील नाल्यातील गाळ काढणे सुरू असल्याचे दिसून आले. काही परिसरात पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना घडतात. त्यामुळे नाल्यातून निघणारा गाळ त्वरित उचलावा, नागरिकांनी या नाल्यात कचरा टाकू नये, अन्यथा परिसरातील नागरिकांनाही अडचणींना सामोरे जावे लागेल. ज्या ठिकाणी जेसीबी जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी लहान यंत्राच्या किंवा मनुष्य बळाद्वारे सदर नाला साफ करावयाच्या सूचना यावेळी महापौरांनी दिल्या.
यावेळी झोन सभापती नूतन भुजाडे, शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे, नगरसेविका सुरेखा लुंगारे, जयश्री डहाके, पंचफुला चव्हाण, नगरसेवक बाळू भुयार, प्रदीप हिवसे, माजी महापौर अशोक डोंगरे, शहर अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) सीमा नैताम, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, अतिक्रमण पथकप्रमुख अजय बन्सेले, उपअभियंता प्रमोद इंगोले, भास्कर तिरपुडे उपस्थित होते.