लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी बुधवारी महापालिकेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जाची तपासणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्यात.शहरातील महापालिकेची चपराशीपुरास्थित प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १३, उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ६, या शाळांची पाहणी केली. यावेळी पूर्व प्राथमिक वर्ग, इतर वर्ग व शाळा इमारतींची पाहणी करून भौतिक सुविधांबाबत माहिती घेतली. महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या ई-लर्निंग वर्गात बसवून अद्यापन पद्धतीचे निरीक्षण केले. शाळांतील मुख्याध्यापकांजवळून शिक्षकांचा स्टाफ, पटसंख्येबाबत माहिती जाणून घेतली. शैक्षणिक दर्जा तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना ब्लॅक बोर्डवर गणितीय क्रिया करण्यास लावल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व भाषा विषयावर आधारित प्रश्न विचारले. शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला. सर्वे करून विद्यार्थ्यांची संख्या वाढवून उपयोग नाही, शिक्षण असे असावे की विद्यार्थी स्वत:हून या शाळेत यायला पाहिजे. महानगरपालिकेच्या शाळेला जी मदत लागेल ती देण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले. यावेळी शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, शाळा निरीक्षक उमेश गोदे, अतुल आळशी अध्यक्ष तपोवन संस्था, सचिव वसंत बुटकेव मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.पटसंख्या वाढीसाठी सूचनाशिक्षकांनी परिश्रमातूनन विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे. विद्यार्थी हा केंद्र बिंदू असून त्याची प्रगती करणे हे शिक्षकाचे आद्यकर्तव्य आहे. ते आपण प्रामाणिकपणे पार पाडावे. पटसंख्यावाढीसाठी शिक्षणाधिकारी तसेच सर्व शिक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्यात.
जिल्हाधिकारी,आयुक्तांद्वारा शाळांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:10 AM
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी बुधवारी महापालिकेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जाची तपासणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्यात.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांशी संवाद : शैक्षणिक दर्जाची तपासणी, प्रगतीसाठी शुभेच्छा