बडनेरा : भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी गुरुवारी बडनेरा रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला प्रामुख्याने वॅगन कारखान्याला भेट दिली त्याठिकाणच्या कामाची संपूर्ण माहिती जाणून घेतली.
रेल्वे प्रबंधकांचा हा नियमित पाहणी दौरा होता त्यांनी रेल्वेस्थानकाच्या विविध भागातील कामे पाहीलित सिग्नल प्रणाली, मालधक्का तसेच निर्माणाधीन रेल्वे वॅगन कारखान्याची पाहणी केली आतापर्यंत किती काम झाले अजून किती वेळ लागणार याची इत्थंभूत माहिती जाणून घेतली रेल्वे कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅकची देखील पाहणी केली त्यानंतर बडनेरा रेल्वे स्थानकावर काही कामे सुरू आहेत तर नव्याने कामकाज होणार आहे त्यावर विविध विभागांच्या अधिकार्यांशी चर्चा केली ते महाराष्ट्र एक्सप्रेस ने आले होते त्याच गाडीने परत भुसावळकडे रवाना झाले स्टेशन मास्तर पी. के. सिन्हा यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.
बॉक्स: युवा स्वाभिमानने दिले मागण्यांचे निवेदन
खासदार नवनीत राणा यांच्या लेटर पॅडवर एका मागणीचे निवेदन देण्यात आले त्यात प्रामुख्याने जुन्या व नव्या वस्तीतील ट्युशन क्लासेसचे विद्यार्थी इतर कामकाजासाठी दैनंदिन पायदळ व सायकलने जाणाऱ्यांसाठी स्वतंत्र पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग करावा असे नमूद आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या निवेदनात हॉकी ग्राउंडवर शहरातील खेळाडूंना खेळण्याची अनुमती द्यावी तसेच भविष्यात चांदणी चौकाकडून रेल्वेस्थानकाचे प्रवेशद्वार बंद करू नये त्याच भागाने प्रवेश ठेवण्यात यावा असे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हा अध्यक्ष जितू दुधाने, पराग चिमोटे, नितीन बाहेकर, शुभम उंबरकर, सिद्धार्थ बनसोड, विलास वाडेकर ,अयुबखान प्रभाकर मेश्राम कमृद्दिन आफताब खान आदी उपस्थित होते