अमरावती : संचारबंदीच्या शिथिलतेनंतर पहिल्याच दिवशी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी विविध भागांत पाहणी केली. जीवनावश्यक दुकाने सकाळी ७ ते ११ दरम्यान उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रविवारी महापालिका आयुक्त यांनी चित्रा चौक येथे पाहणी केली व पोलीस उपायुक्त शंशीकांत सातव यांच्याशी चर्चा केली.
या परिसरात गर्दीचे प्रमाण अधिक असल्यामुळे दुकानदारांनी सूचनाची काटेकोर अंमलबजावणी करावी, यासाठी कारवाईचे निर्देश आयुक्तांनी अतिक्रमन विभाग, बाजार व परवाना विभागाला दिले. मास्क न लावणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चित्रा चौक येथे अँटिजेन टेस्ट करणे सुरू होते. येथे डॉ. संदीप पाटबागे यांना टेस्टींग वाढविण्याच्या सूचना दिल्या. इतवारा परिसराची पाहणी करताना ११ वाजतानंतरही काही दुकाने उघडी होती. त्यांना बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक अजय सारसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, अतिक्रमन विभागप्रमुख अजय बन्सेंले, बाजार व परवाना अधीक्षक उदय चव्हाण उपस्थित होते. गांधी चौक येथे महापालिकेद्वारा फिरते पथकाव्दारे अँटिजेन टेस्ट सुरू होते. डॉ. देवेंन्द्र गुल्हाने यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला.
बॉक्स
आयसोलेशन दवाखान्याला भेट
नवाथे येथील आयसोलेशन दवाखाना भेट देवून आयुक्तांनी सुरु असलेल्या चाचणी प्रकीयेची स्थिती जाणून घेतली. साधारणत: या केन्द्रांवर १५० ते २०० तपासण्या होतात अशी माहिती यावेळी देण्यात आली. सकाळी ११ नंतर कोणतेही दुकाने, भाजीपाला गाडया चालू राहता कामा नये. दिलेल्या अवधीतच त्यांनी सुरु ठेवावे. गर्दी होवू नये यासाठी आपल्या स्तरावरून योग्य नियोजन करण्याचे निर्देश साईनगर परिसराची पाहणी करतांना स्वास्थ निरीक्षकाला दिले