लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आज वरुड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाऊन तूर खरेदीची माहिती घेतली. आमदार अनिल बोंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी खरेदी केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. तुरीची आवक, केंद्रावरील उपलब्ध सुविधा याबाबत त्यांनी तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. व रजिस्टरही तपासले. तूर विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पालकमंत्र्यांकडून वरुड तूर खरेदी केंद्राची पाहणी
By admin | Published: May 21, 2017 12:09 AM