अमरावती : पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेता गणेशभक्तांनी मातीच्या गणपतीची स्थापना करावी,
असे आवाहन महापालिका आयुक्त प्रशांत राेडे यांनी केले आहे. गुरूवारी नेहरू मैदान स्थित मूर्ती विक्री
स्टॉलला भेट देऊन त्यांनी विक्रेते, गणेशभक्तांशी संवाद साधला.
यावेळी पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, बाजार व परवाना अधीक्षक उदय चव्हाण तसेच मातीचे गणपतीचे मूर्तिकार कैलास रोतळे, चरण उचाडे, दिलीप नांदुरकर, महादेव सरोदे, संजय मुंधरे, नामदेव पोहनकर, धनराज खेडकर, संदीप काळकर आदी उपस्थित होते.
प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून तयार होणाऱ्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाही तसेच मूर्ती सुशोभित करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या रासायनिक रंगामुळे पर्यावरणाची हानी होते. याबाबत विविध स्वरुपाच्या उपाययोजना करुन गणेशोत्सवादरम्यान मातीच्या मूर्तीचा वापर जास्त प्रमाणात व्हावा, याकरिता महापालिकेकडून जनजागृती तसेच नागरिकांना मातीपासून निर्मित मूर्ती उपलब्ध करुन देण्याचे अनुषंगाने वेळोवेळी मूर्तिकार संघटनेच्या बैठक घेण्यात आल्यात. परिणामी बाजारात मातीच्या गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नेहरू मैदान येथील शाळेच्या बाजूला मातीच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी ३० स्टॉल ठेवण्यात आले आहेत.
--------------------
सहा वर्षात मातीच्या मूर्तीची निर्मिती
सन २०१७ : ६०००,
सन २०१८ : ८०००
सन २०१९ : १८,०००
सन २०२० : ५३,०००
सन २०२१ : ६०,०००
------------------