लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घटनेची माहिती मिळताच तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. ३७ कुटुंबीयांना तातडीने सानुग्रह अनुदान द्यावे, त्यांची जेवणाची सोय करावी, अशा सूचना त्यांनी तहसीलदार संतोष काकडे यांना दिल्या. आगग्रस्तांनी पुनर्वसनाबाबत प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. वलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत ३७ कुटुंबांना तात्पुरते आश्रय दिले आहे. यावेळी दोन दिवस त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून सोमवारी प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यावेळी नायब तहसीलदार दिनेश बढीये, मंडळ अधिकारी व्ही. एम साव, तलाठी एन. एम. वाकोडे, वलगावच्या सरपंच मोहिनी मोहोड, प्रहारचे वसू महाराज, वलगावचे ठाणेदार मोहन कदम उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी उद्यसिंह राजपूत, गटविकास अधिकारी डी. बोरखडे आदींनी घटनास्थळाला भेट दिली.आगग्रस्त कुटुंबियांना देण्यात येणारे सानुग्रह अनुदान तोकडेच आहे. या परिवारांना वाढीव अनुदान मिळावे, याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे आमदार यशोमती ठाकूर यांनी सांगितले. घरे बांधणीकरिता सारडा यांच्या शेतीचे प्रकरण न्यायालयाने निकाली काढले आहे. लवकरच तेथे पुनर्वसनग्रस्तांना भूखंड मिळणार आहेत. आगग्रस्तांना शासनाची सर्व मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही आ. यशोमती ठाकूर यांनी आगग्रस्तांना धीर देताना स्पष्ट केले.महावितरणचा हलगर्जीपणायेथे वीज वितरणाच्या विद्युत खांबावरील तारा लोंबकळत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. राजकन्या अशोक वानखडे यांनीही तार लोंबकळत असल्याची तक्रार नोंदविली होती. मात्र, वीज वितरणने दुर्लक्ष केले. अखेर तारांमधील घर्षणाने रविवारी आगडोंब उठल्यामुळे ३७ घरांना झळ बसली. याला वीज वितरणाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप होत आहेफायर फायटरचे परिश्रमआगीच्या माहितीवरून ट्रान्सपोर्टनगरातील उपक्रेंद्रप्रमुख सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वात फायरमन योगेश ठाकरे, शिवा आडे, नशिरोद्दीन शेख, निखिल बढे, दिलीप चौखंडे, देवकर, इंगोले, गजभिये, काटमिलवार, अलुडे, नितीन इंगोले, ठोसर, चांदुरबाजारचे ईजाजभाई, रमेश आमदरे, रुपेश मोगरे, नरेश कोठारे आणि बडनेरा व अचलपूर येथील अग्निशमन दलाने परिश्रम घेतले.
तातडीने सानुग्रह अनुदान देण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 1:19 AM