लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील धारणी तालुक्यातील मौजा साद्राबाडी आणि झिल्पी परिसरातील भूकंपलहरीच्या पार्श्वभूमीवर नियमितपणे अद्ययावत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना बुधवारी दिले आहेत.नैसर्गिक आपत्तीसारख्या संवेदनशील बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन व आपली जबाबदारी ओळखून यंत्रणा सुसज्ज ठेवावी व वेळोवेळी अहवाल द्यावा, असे त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना कळवले आहे. साद्राबाडी येथे पाच दिवसांत हा तिसरा भूकंप असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.तांत्रिक चमू पाठविण्याबाबत सूचनाभूकंपाच्या तीव्रतेबाबत माहिती मिळण्यासाठी तत्काळ तांत्रिक चमू पाठविण्यात यावी, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाच्या महासंचालकांना आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या विभागीय महासंचालकांना कळविले आहे. त्याचप्रमाणे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, एस.टी.महामंडळाचे विभागीय नियंत्रक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, महावितरण व महापारेषणचे अधीक्षक अभियंता, बीएसएनएल व शिक्षण विभागाचे अधिकारी यांना सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत.
साद्राबाडी घटनेबाबत जिल्ह्यातील विविध विभागांना सुसज्ज राहण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:01 PM
मेळघाटातील धारणी तालुक्यातील मौजा साद्राबाडी आणि झिल्पी परिसरातील भूकंपलहरीच्या पार्श्वभूमीवर नियमितपणे अद्ययावत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना बुधवारी दिले आहेत.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : नैसर्गिक आपत्तीचे गांभीर्य पाहता नियमित अद्ययावत अहवाल