शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
2
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
3
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
4
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
5
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
6
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
7
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
8
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
9
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
10
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
11
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
12
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
13
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
14
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
15
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
16
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
17
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
18
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
19
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निर्देश

By admin | Published: September 13, 2015 12:08 AM

नगरपरिषद मागील वर्षापासून विविध समस्यांनी त्रस्त झाली आहे. निवडणूक काळामध्ये शहरवासीयांना दिलेली मोठमोठी आश्वासने पूर्ण झाली नाहीत.

अंजनगाव सुर्जी : नगरपरिषद मागील वर्षापासून विविध समस्यांनी त्रस्त झाली आहे. निवडणूक काळामध्ये शहरवासीयांना दिलेली मोठमोठी आश्वासने पूर्ण झाली नाहीत. येथील स्मशानभूमीचीदेखील दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांचा अंतिम प्रवासही त्रासदायक होत आहे. खोडगाव मार्गावरील हिंदू स्मशानभूमितील पेव्हींग ब्लॉक व काँंक्रीट रस्त्याचे ८ लाख ३७ हजार रुपयांचे काम केले. परंतु या स्मशानघाटामध्ये पूर्णपणे फुटलेले पेव्हींग ब्लॉक लावण्यात आले.इतर कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले होते. याबाबतची तक्रार प्रभागाच्या नगरसेविका सुनीता मुरकुटे यांनी मुख्याधिकारी, आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी क्वॉलिटी कंट्रोल विभागाकडे केली. त्यानंतर आमदार रमेश बुंदिले यांनी स्वत: स्मशानभूूमीतील पेव्हींग ब्लॉक घोटाळ्याची चौकशी व पाहणी केली असता या निकृष्टदर्जाच्या कामाबाबत संबंधित विभागाकडे अहवाल सुध्दा कळविला. तसेच शहरातील आरोग्य विभागाच्या वाढत्या समस्येची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन शहराला अचानक भेट देण्याचे ठरविले. या भेटीदरम्यान खरा प्रकार उघडकीस आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष लागले.