आॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आढळलेल्या दूषित पाण्यामुळे अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच कार्यकारी अभियंता एस.एस. कोपुलवार यांनी गांभीर्याने दखल घेतली. योग्य पद्धतीने पाणी तपासणी करून तो अहवाल सादर करण्याच्या सूचना जलसेवकांना दिल्या. दूषित पाणी तपासणीवेळी संबंधित ग्राहकांच्या स्वाक्षºया घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तब्बल ९० हजार कुटुंबीयांना शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्रापासून शहरातील विविध टाक्यापर्यंत पाइपलाइनद्वारे या शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. शहरातील नाल्यांतून ही पाइपलाइन गेलेली असून गळतीमुळे नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा ग्राहकांना होत असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. मजीप्राच्या पाइप लाइनमधून ३० टक्के गळतीचे प्रमाण असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवतो.प्राधिकरण वर्तुळात खळबळ'अमरावतीत शुद्ध पाण्याची नो गॅरन्टी' या मथ्यळ्याखाली 'लोकमत'ने लोकदरबारी वृत्त प्रकाशित करताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत कार्यकारी अभियंता कोपुलवार यांनी पाणी तपासणीची गंभीरता लक्षात घेता जलसेवकांना सूचना देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सोबतच पाणी तपासणीचे नमुने घेताना संबंधित ग्राहकांची स्वाक्षरी घेऊन त्यांच्यासमोरच पाणी नमुने घेण्याचे निर्देश दिले. पाणी तपासणीबाबतचा अहवालसुद्धा त्यांनी मागविला आहे.पाणी गळती बंद करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्नशहरात ३० टक्के पाणी गळतीचे प्रमाण आहे. कुठेही पाणी गळती आढळल्यास मजीप्रा विभागाशी संपर्क साधावा. पाणी गळती थांबविण्यासाठी मजीप्रा अधिकारी युद्धस्तरावर काम करीत आहे. मात्र, काही ठिकाणी सिमेंटचे रस्ते तयार झाल्यामुळे पाणी गळतीचे ठिकाण ट्रेस करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र, त्यावरही उपाययोजना मजीप्रा करीत आहे. रहाटगाव ते वडगाव दरम्यानची पाणी गळती बंद करण्यासाठी मजीप्रा यंत्रणा कामाला लागली आहे.पाणी तपासणी योग्य पद्धतीने करणे जलसेवकांना बंधनकारक आहे. दरम्यान संबंधित ग्राहकांची स्वाक्षरी घेण्याच्या सूचना देऊ. त्यासंबंधाने अहवाल मागविण्यात येईल.- एस.एस.कोपुलवार,कार्यकारी अभियंता
योग्य पाणी तपासणीसाठी जलसेवकांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:00 PM
आॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आढळलेल्या दूषित पाण्यामुळे अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच कार्यकारी अभियंता एस.एस. कोपुलवार यांनी गांभीर्याने दखल घेतली. योग्य पद्धतीने पाणी तपासणी करून तो अहवाल सादर करण्याच्या सूचना जलसेवकांना दिल्या. दूषित पाणी तपासणीवेळी संबंधित ग्राहकांच्या स्वाक्षºया घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ...
ठळक मुद्देअहवाल मागविला : पाणी तपासणीवेळी ग्राहकांची सही अनिवार्य