शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
2
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
3
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
4
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
5
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

खरीप पिकाला यंदाही विम्याचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:09 AM

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सरंक्षण मिळणार आहे. यात सहभागी होण्याासाठी १५ जुलै ‘डेडलाईन’ देण्यात ...

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सरंक्षण मिळणार आहे. यात सहभागी होण्याासाठी १५ जुलै ‘डेडलाईन’ देण्यात आलेली आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदारांचा सहभाग ऐच्छिक करण्यात आलेला आहे.

खरीप हंगामात अपुरा पाऊस, हवामान घटकांच्या प्रतिकुलतेमुळे पिकांचे ७५ टक्के क्षेत्रावर पेरणीचे नुकसान झाल्यास विमा भरपाई देय राहणार आहे. याशिवाय काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदीमुळे सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित असेल तेव्हा अधिसूचित क्षेत्रात विमा सरंक्षण देय राहील. याशिवाय अन्य संकटाच्या प्रसंगी नियमानुसार विमा देय राहणार आहे.

काढणीपश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखमेंतर्गत बाधिक पीक व बाधित क्षेत्राबाबत घटनेच्या ७२ तासांच्या आत विमा कंपनी किंवा कृषी व महसूल विभागाला कळविणे यांना बंधनकारक आहे.

बॉक्स

कर्जदार शेतकरी इच्छुक नसल्यास घोषणापत्र हवे

कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी न होण्याचा पर्याय आहे. तसे घोषणापत्र विम्यात सहभागी होण्याच्या अंतिम दिनांकाच्या सात दिवस अगोदरपर्यंत देणे बंधनकारक आहे. जे शेतकरी घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करून विमा योजनेत सहभागी करण्याबाबतची कार्यवाही बँकामार्फत केली जाणार आहे.