अमरावती : जिल्ह्यात ७५ हजार ४७७ शेतकरी सभासदांनी विहीत मुदतीत कर्जाचा भरणा केल्यामुळे १ लाखापर्यंत ३ टक्के व १ लाखाच्यावर ३ लाखापर्यंतच्या कर्जावर १ टक्का या प्रमाणात व्याज सवलत देण्यात आली आहे. ८७ टक्के कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. जिल्हा सहकारी बँकेने सहकार्य केलेले नाही. अन्यथा ९८ ते १०० टक्के शेतकरी कर्जाचे पुनर्गठन झाले असते असे ना. प्रवीण पोटे यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.यंदा पाच हजार लाभार्थ्यांना वैरण बियांचा पुरवठा करण्यात आला. कामधेनू दत्तकग्राम योजना ९८ गावांमध्ये राबविण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत १५६ लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले. २७३ लाभार्थ्यांना शेळी गटाचे वाटप करण्यात आले असल्याचे ना. पोटे यांनी सांगितले. संत्रा पिकावरील काळी व पांढरी माशी नियंत्रणासाठी ५० लाख रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)शहरासाठी उपलब्धीविविध विकास कामासाठी महापालिकेला ६२ कोटी.शहर स्मार्ट शहर करण्याचे यादीत.राजापेठ उड्डाणपुलाचे काम येत्या दोन वर्षात पूर्णत्वास येणार आहे. आदिवासी उपयोजनांसाठी १२१ कोटीसन २०१५-१६ मध्ये एकूण आदिवासी उपयोजनेसाठी १२१.७१ कोटी मंजूर आहेत. यापैकी ११८.७८ कोटी रूपयांचे वाटप यंत्रणेला करण्यात आले आहे. ३४४ आदिवासींना बैलजोडी व २३ बैलगाडीचे वाटप व विहिरीसाठी ३८८ पाईप, ३४२ पंपसंच वाटप करण्यात आले आहे.७ हजार २७२ पत्रे प्राप्तपालकमंत्री म्हणून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वर्षभऱ्यात ७ हजार २७२ पत्र आपणास प्राप्त झाले आहे. पालकमंत्री आम्हाला सहज सुलभ भेटतात व नि:संकोच काम सांगता येते, असे त्यात नमूद आहे. ऐवढी पत्र प्राप्त होणे हे आपण सौभाग्य समजतो असे ना. पोटे यांनी सांगितले.
७५ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जात व्याज सवलत
By admin | Published: November 01, 2015 12:22 AM