किरण होले ।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : नगराध्यक्ष नलिनी प्रकाश भारसाकळे यांच्या घरकामावरील गडी सुधाकर हातेकर याचा पालिका कामात हस्तक्षेप वाढला. यामुळे त्रस्त झालेल्या भाजपा गटनेत्यांनी पोलिसात मंगळवारी तक्रार केल्याने शहरात राजकीय भूकंप आला आहे. या प्रकरणामुळे नगराध्यक्षांना घराचा अहेर मिळाला आहे.नगराध्यक्षांचे नाव घेऊन कर्मचाºयांना धमकाविणे, प्रशाकीय दस्तऐवज तासणी, कर्मचाºयांना वेठीस धरून आपली कामे करून घेणे या प्रकारामुळे कर्मचारी व पालिकेतील अन्य पदाधिकारी कमालीचे त्रस्त झाले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे निर्वाचित नगरसेवकदेखील त्रासले आहेत, असा आरोप करीत दर्यापूर नगर पालिकेतील भारतीय जनता पार्टीचे गटनेते असलम मज्जीत घाणीवाले यांनी दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत नगराध्यक्षांच्या घरकामावरील गड्याने पालिका कामात हस्तक्षेप करून नये, यासंदर्भात मुख्याधिकाºयांना निवेदन दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. बुधवारी भाजपा गटनेत्यांनी मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्याकडे रीतसर तक्रार केल्यावर पोलिसांकडे तक्रार केली. दर्यापूर नगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे.कर्मचाºयांत भीतीचे वातावरणविरोधातील काँग्रेस नगरसेवकांची संख्या अधिक आहे. यामुळे प्रशासकीय कामे करताना नगराध्यक्षाचे नाव सांगून सुधाकर हातेकर हेच निर्णय घेतात. यामुळे भाजपाच्या निर्वाचित नगरसेवकांना आपली मते मांडता येत नाहीत. शिवाय अतिरिक्त हस्तक्षेप असल्यामुळे पक्षकामकाजाबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे यांना संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. नगर पालिकेतील नगराध्यक्षांच्या कक्षात नलिनी भारसाकळे उपस्थित नसताना सुधाकर हातेकर प्रशासकीय कामकाजात ढवळाढवळ करतात. कर्मचाºयांना धाकदपट करतात. त्यांना वैयक्तिक कामे सांगतात. यामुळे नगर पालिका कर्मचाºयांत भीतीचे वातावरण आहे. सुधाकर हातेकर कक्षात असताना कुणीच तेथे जाण्यासाठी धाजवत नाहीत.सभेत मज्जाव करा - सुधाकर हातेकर नगराध्यक्षांचे नाव घेत अनेक कामे मार्गी लावतात. सभेत नगराध्यक्षांना सल्ला देतात. कामकाजात लुडबुड करतात. यामुळे सभेच्या कामकाजात अडचणी येते. सुधाकर हातेकर यांनी नगरपालिकेच्या कामकाजात मज्जाव करण्यासदंर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हाधिकाºयांसह तस्सम अधिकाºयांना पाठविल्या आहेत.
घरगड्याचा पालिकेत हस्तक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 10:23 PM
नगराध्यक्ष नलिनी प्रकाश भारसाकळे यांच्या घरकामावरील गडी सुधाकर हातेकर याचा पालिका कामात हस्तक्षेप वाढला. यामुळे त्रस्त झालेल्या भाजपा गटनेत्यांनी पोलिसात मंगळवारी तक्रार केल्याने शहरात राजकीय भूकंप आला आहे.
ठळक मुद्देभारसाकळेंना घरचा अहेर : भाजपा गटनेत्याचीच पोलिसात तक्रार