विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:18 AM2019-07-29T01:18:28+5:302019-07-29T01:19:58+5:30

विधानसभा निवडणुसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यासाठी काँग्रेस प्रदेश नेत्यांनी रविवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात.

Interviews of Congress aspirants for the Legislative Assembly | विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती

विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती

Next
ठळक मुद्देरावसाहेब शेखावत अनुपस्थित : आठ मतदारसंघात २५ जण इच्छुक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा निवडणुसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यासाठी काँग्रेस प्रदेश नेत्यांनी रविवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात. यावेळी आठ शहर व ग्रामीण अशा दोन टप्प्यात २५ इच्छुकांनी मुलाखती देत आपल्या कार्याचा लेखाजोेखा सादर केला.
पक्ष निरीक्षक म्हणून माजीमंत्री वसंत पुरके, माजी आमदार आशिष देशमुख, जिल्हा प्रभारी रवींद्र दरेकर यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात. रविवारी प्रारंभी सकाळी स्थानिक चौबळ वाडा येथील काँग्रेस कार्यालयात अमरावती व बडनेरा मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्यानंतर दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद विश्राम भवनात ग्रामीण भागातील तिवसा, धामणगाव रेल्वे, मोर्शी, दर्यापूर, अचलपूर व मेळघाट अशा सहा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्यात. अमरावती विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी मुलाखत न दिल्यामुळे हा विषय चर्चेचा ठरला. तिवस्यातून आमदार यशोमती ठाकूर, तर धामणगाव रेल्वे मतदारसंघातून आमदार वीरेंद्र जगताप यांनी मुलाखत दिली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी अचलपूर मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे.
 

Web Title: Interviews of Congress aspirants for the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.