लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महानगराच्या पश्र्चिमेकडील भागातील लालखडीत एक दोन नव्हे तर चार अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष व्यक्तींचे हे कत्तलखाने असून, या भागातील रहिवासी जीव मुठीत घेऊन जीवन कंठत असल्याचे चित्र आहे. नाल्यावाटे जाणारे सांडपाणी लालगर्द झाल्याचे भीषण वास्तव येथे अनुभवास येत आहे.नागपुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत लालखडी भागातील जाफरीया मशिद, वॉटर सप्लायसमोरील अवैध जागेत भले मोठे कत्तलखाने उभारले आहे. राज्य शासनाने गोवंश हत्या बंदी लागू केली असताना लालखडी भागात अवैध कत्तलखान्यात एकाच वेळी ७० ते ८० गोवंशाची हत्या केली जात असल्याचे भीषण वास्तव आहे. या अवैध कत्तलखान्यांना पोलीस प्रशासनाने अभय असल्याचा आक्षेप स्थानिक नागरिकांनी केला आहे. लालखडी भागातील कोणत्याही नालीतून वाहणारे सांडपाणी हे लाल रंगाचेच दिसून येते. अवैध कत्तलखाने हे दबंग लोकांचे असल्यामुळे या भागातील गरीब, सामान्य व्यक्ती हा सर्व प्रकार निमूटपणे सहन करतात. अगदी नाल्यांच्या काठावर बिनधास्तपणे अवैध कत्तलखाने सुरू असताना हे पोलिसांना लक्षात येऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.प्लास्टिक बॉक्समध्येमांस पोहचविण्याची शक्कलएखाद्या कंपनीची वस्तू असल्याचे प्लास्टिक ड्रम अथवा बॉक्सवर अंकित करून आत बर्फ मिसळलेले गोमांस किमान पाच दिवस खराब होणार नाही, अशा पद्धतीने पॅकिंग करून ते ट्रकने मुंबईला पोहचविले जाते. तेथून विदेशात रवाना होत असल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली आहे.मुंबईला ट्रकद्वारे पाठविले जाते मांसलालखडी भागात अवैध कत्तलखान्यात कटाई केलेल्या गोवंशाचे मांस मुंबईत ट्रकद्वारे पाठविले जाते. प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय मांसाने भरलेला ट्रक सुखरूपपणे जाण्याकरिता बिदागी ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोवंश मांसाला विदेशात मागणी असल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती मांस पाठविण्याचे मुख्य केंद्र बनले आहे. यापूर्वी ट्रक पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.मध्य प्रदेशातून आणले जातात गोवंशमध्यप्रदेशातून ट्रकद्वारे गोवंश कोंबून आणताना आतापर्यंत शेकडो कारवाया विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. त्यामुळे गोवंश याच कत्तलखान्यात कटाईकरिता येत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. मात्र, गोवंशाचे मांस प्लास्टिक बॉक्समध्ये पार्सलद्वारे वाहून नेताना नागपुरी गेट पोलीस, वलगाव, राजापेठ, गाडगेनगर, बडनेरा व लोणी पोलीस ठाण्यांसमोरून हे ट्रक जाताना पोलिसांना अद्याप का दिसले नसावे, हा याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.महापालिका क्षेत्रात गोवंश हत्या संबंधित एकाही कत्तलखान्यास परवानगी नाही. याबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास अगोदर पोलिसांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतरच कायदेशीर कारवाई करता येते.- सचिन बोंद्रे,पशू वैद्यकीय अधिकारी, महापालिकागोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला. त्यामुळे गोवंशाचे मांस कापणे किंवा विक्री करता येत नाही. किंबहुना छुप्या मार्गाने कोणी अवैध कत्तलखाना चालवित असेल तर तक्रारीनुसार कारवाई केली जाईल.- अर्जुन ठोसरे,निरीक्षक, नागपुरी गेट पोलीस ठाणे
लालखडीत अवैध क त्तलखाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 9:35 PM
महानगराच्या पश्र्चिमेकडील भागातील लालखडीत एक दोन नव्हे तर चार अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष व्यक्तींचे हे कत्तलखाने असून, या भागातील रहिवासी जीव मुठीत घेऊन जीवन कंठत असल्याचे चित्र आहे. नाल्यावाटे जाणारे सांडपाणी लालगर्द झाल्याचे भीषण वास्तव येथे अनुभवास येत आहे.
ठळक मुद्देनाल्यांचे सांडपाणी झाले लाल : मुंबईमार्गे विदेशात मांस पुरवठा