(लोकमत इम्पॅक्ट)
येवदा : ग्रामपंचायतीत पथदिवे घोटाळ्याचे प्रकरण तापले आहे. याची तातडीने चौकशी करण्याची मागणी उपसरपंच मुजम्मील जमादार यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
येवदा येथील ग्रामपंचायत सदस्य सुयोग टोबरे यांनी ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा माकोडे यांच्यावर पथदिवे खरेदीत अपहाराचा आरोप केला होता. त्यामध्ये सरपंच यांनी ही बाब फेटाळून लावली व उपसरपंच मुजम्मील जमादार व इतर काही सदस्य माझ्यावर दबावतंत्राचा वापर करून गैरकामाच्या बिलांवर व धनादेशावर हस्ताक्षर करायला लावतात, असे स्टेटमेंट दिल्याने उपसरपंच व सदस्य यांच्यात खळबळ उडाली. या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्यांसोबत चर्चा केली असता, सरपंच यांनी लावलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले व अद्याप पर्यंत झालेली विकास कामे व साहित्य खरेदी ही सरपंचाने स्वतः व त्यांचे पती यांनी केलेली आहे तसेच सरपंच व त्यांचे पती यांनी गावातील काही विकासकामांचे उद्घाटन स्वतः केलेले आहेत तसेच स्ट्रीट लाईटची खरेदी सुद्धा कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात न घेता सरपंच व त्यांचे पती यांनी स्वतः खरेदी केली त्यामुळे प्रतिभा माकोडे यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले सदर प्रकरणातील चौकशी अधिकारी गटविकास अधिकारी रायबोले यांनी याप्रकरणाची चौकशी २६ ऑगस्टपर्यंत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे येवदा नगरीतील भ्रष्टाचारी कोण, याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
*उपसरपंच मुजम्मील जमादार यांची प्रतिक्रिया*
मी जर विकास कामे स्वतःच्या मर्जीने केली असते तर सदस्यांनी सरपंच ऐवजी माझी तक्रार केली असती येवदा गावात इलेक्ट्रिकल साहित्याची उत्कृष्ट दर्जाची दुकाने असल्यावर सुद्धा सरपंच यांची धाव पिंपळोद या छोट्याशा गावातील दुकानावर का? सरपंचांनी माझ्यावर लावलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.