सूरज दहाट ।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : विदर्भातील प्रख्यात तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कौंडण्यापूर हे अमरावती- आर्वी राज्यमार्गावर असून, वर्धा जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. येथून वर्धा नदी वाहते. या नदीवरील २५० मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे कठडे जीर्ण झाले असून, ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहे.चार दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एक माता आपल्या चिमुकल्या मुलासह पुलाखालून पाण्यात पडली होती. नदीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. पुलावरील लोखंडी पाईपाचे कठडे सुस्थितीत असते तर चिमुकल्याचा जीव वाचला असता, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.या नदीवर धामणगाव तालुक्यात बगाजी सागर हे धरण आहे. या धरणाचे बॅक वॉटर कौंडण्यपूर ते धामंत्रीपर्यंत पसरले असल्याने नदीच्या दुतर्फा भरपूर पाणी आहे. यंदा या धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने वर्धा नदीत सध्याही भरपूर जलपातळी आहे. या पुलाच्या पृष्ठभागाचे क्रॉक्रिट काही ठिकाणी उखडले आहे. त्यामुळे पाव किमी. लांबीच्या पुलासाठी हे खड्डे धोकादायक ठरणारे आहे. विशेष म्हणजे वर्धा व अमरावती जिल्ह्याची सीमा अधोरेखित करणारा हा पूल आहे. या राज्यमहार्गावरून यवतमाळ- अमरावती व वर्धा या तिनही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक रात्रंदिवस सुरू राहत असल्याने या पुलाचे कठडे मजबूत असणे महत्त्वाचे आहे. पुलाची सुरक्षा कठडे अगदी ३ फुटांपेक्षा कमी असून, जीर्ण झालेले पाईपचे कठडे या पुलाला लावले आहेत. त्यामुळे या पुलाचे कठडे चार फुटांपेक्षा अधिक उंच व मजबूत बसविणे गरजेचे झाले आहे. या पुलावर रात्रीच्या वेळी अंधार राहत असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता दिनकर माहुरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.वर्धा नदीचे घाटही असुरक्षितजिल्ह्यासह विदर्भात वर्धा नदीचे पौरानिक महत्व आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवाळीनंतर महिनाभर यात्रा असते. हजारो भाविक या नदीपात्रात स्रान करतात. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच तजविज जिल्हा व ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली नाही. विकास आराखड्याद्वारे अनेक कामे होत असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कामे देखील होणे महत्वाचे असल्याचे नागरिकांचे मत आहे. या नदी घाटावर दररोज विदर्भातील अनेक गावातून नागरिक अस्थिविसर्जनासाठी येतात. या दरम्यान अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहे. अस्थिविसर्जनासाठी असलेल्या लाकडी डोंग्यात देखील सुरक्षेची कोणतेही साधने नाही. स्थानिक ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने या घाटांवर देखी, सुरक्षेची साधने पुरविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
कौंडण्यपूरचा पूल देतोय अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:18 PM
विदर्भातील प्रख्यात तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कौंडण्यापूर हे अमरावती- आर्वी राज्यमार्गावर असून, वर्धा जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. येथून वर्धा नदी वाहते. या नदीवरील २५० मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे कठडे जीर्ण झाले असून, ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहे.
ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : सुरक्षा कठड्याचे लोखंडी पाईप झाले जीर्ण