वरूड : तालुक्यातील वावरुळी शिवारात यशवंत पोल्ट्री फार्मच्या आवारात आयपीएलआप क्रिकेट सामन्याचे प्रक्षे[पानावरील प्रत्येक स्थितीवर हारजीतचा सत्ता बेटिंग नावाचा जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीच्या पथकाने धाडसत्र राबवून ७ लोकांना अटक केली तर यामध्ये १२ लाख ३२ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाही केली . सात आरोपीना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . या कार्रवाहीमुळे आयपीएल जुगारी हादरले असून तालुक्यात अनेक गावात लाखो रुपयांचा आयपीएल सट्टा जुगार खेळाला जातो .
गुन्हे शाखेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार याती आरोपीची नावे अमोल पुंडलिक यावले २६ जरुड , मंगेश विजय बिजवे ३८, निलेश साहेबराव माकोडे ३२ सर्व रा . वरुड , मुकुल शंकर गणोरकर २३ , आकाश बाबाराव ब्राम्हणे २४, मनीष सुभाष खडसे२४ , विशाल किसनराव ठाकरे २६ सर्व रा . जरुड असे ७ आरोपी असून काटोल चा एक फरार झाला आहे . तालुक्यातील अमोल यावले यांचे वावरुळी शिवारातील यशवंत पोल्ट्री फार्म वर बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीत विवो आयपीएल सिझन १४ नावाचा क्रिकेट सामने चारचाकी वाहनात बसून क्रिकेट सामन्याच्या प्रत्येक स्थितीवर मोबाईल च्या मधून लोकांकडून पैशाची बाजी लावून हारजीतचा बेटिंग नावाचा क्रिकेट सट्टा खेळत होते . स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीच्या पथकाला गोपनीय माहहती मिळाल्या वरून पोलीस अधीक्षक श्री हरी बालाजी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शाम घुगे , स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरज सुसतकर , पोना दीपक सोनाळेकर , युवराज मानमोठे , अमित वानखडे , निलेश डांगोरे , चेतन दुबे , स्वप्नील तंवर , विनोद हिवरकर , सागर धापड, रितेश वानखडे , बेनोदाचे उपनिरक्षगक पुपुलवार , पोहेकर शशिकांत पोहरे , घोरमाडे यांचे पथकाने शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच दरम्यान धाडसत्र राबविले . तेंव्हा आरोपीना रंगेहात पकडून अर्टिका कार , दुचाकी ऍक्टिवा , विविध कंपन्यांचे १७ मोबाईल आणि नगदी २७ हजार ४५० रुपये असा एकूण १२ लाख ३२ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीना ताब्यात घेतले . तर काटोलचा एक आरोपी पळून गेला . सदरे आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून रविवार न्यालयात हजार केले असता ४ मे पर्यंत २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास बेनोडा ठाणेदार मिलिंद सरकटे सह बेनोडा पोलीस करीत आहे . या कार्रवाहीमुळे आयपीएल जुगारी हादरले असून तालुक्यात अनेक गावात लाखो रुपयांचा आयपीएल सट्टा जुगार खेळाला जातो .